परतीच्या पावसाने लातूर जिल्हावासीयांच्या आशा उंचावल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2019 11:47 AM2019-09-25T11:47:01+5:302019-09-25T11:47:58+5:30

लातूर जिल्ह्यात मंगळवारी रात्री सर्वदूर पाऊस झाला.

The return rains raised the hopes of Latur district residents | परतीच्या पावसाने लातूर जिल्हावासीयांच्या आशा उंचावल्या

परतीच्या पावसाने लातूर जिल्हावासीयांच्या आशा उंचावल्या

Next
ठळक मुद्देसर्वाधिक पाऊस शिरूर अनंतपाळ तालुक्यात झाला आहे. सर्वात कमी पाऊस देवणी तालुक्यात

लातूर : लातूर जिल्ह्यात मंगळवारी रात्री सर्वदूर पाऊस झाला. या परतीच्या पावसाने जिल्ह्यातील नागरिकांच्या आशा उंचावल्या आहेत. सर्वाधिक पाऊस शिरूर अनंतपाळ तालुक्यातील साकोळ मंडळात असून ६० मी.मी. अशी नोंद आहे. 

बुधवारी सकाळ पर्यंत जळकोट तालुक्यात सरासरी १३ मी.मी., चाकूर- १९ मी.मी., रेणापूर- १५.६ मी.मी., निलंगा- ११.६ मी.मी., लातूर- १४.६ मी.मी., उदगीर- ८. १४ मी.मी., औसा- २९.१४, अहमदपूर- ११.१६, शिरूर अनंतपाळ- ४८ मी.मी., तर देवणी तालुक्यात ०.३३ मी.मी. पाऊस झाल्याची नोंद आहे. 

सर्वाधिक पाऊस शिरूर अनंतपाळ तालुक्यात झाला आहे. शिरूर अनंतपाळ तालुक्यातील साकोळ मंडळात ६०, हिसमाबाद- 46, शिरूर अनंतपाळ- 38, तसेच मातोळा (ता. औसा)- ५७, निलंगा तालुक्यातील निटूर- ५२, पानचिंचोली- ४१, तर लातूर तालुक्यातील हरंगुळ मंडळात ३४ मी.मी. पाऊस झाल्याची नोंद आहे. याशिवाय अन्य मंडळात यापेक्षा कमी पाऊस आहे. सर्वात कमी पाऊस देवणी तालुक्यात असून ०.३३ मी.मी. असा आहे.

Web Title: The return rains raised the hopes of Latur district residents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.