रेणापूर ग्रामीण रुग्णालय, कोविड केअर सेंटरचा आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:20 AM2021-05-18T04:20:47+5:302021-05-18T04:20:47+5:30
यावेळी तहसीलदार राहुल पाटील, पंचायत समिती सभापती रमेश सोनवणे, भाजपा तालुकाध्यक्ष दशरथ सरवदे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नारायण देशमुख, ...
यावेळी तहसीलदार राहुल पाटील, पंचायत समिती सभापती रमेश सोनवणे, भाजपा तालुकाध्यक्ष दशरथ सरवदे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नारायण देशमुख, वैद्यकीय अधीक्षक डॉ. आनंद कर्नावट, भाजप जिल्हा उपाध्यक्ष वसंत करमुडे, पालिकेचे बांधकाम सभापती दत्ता सरवदे, सभापती उज्ज्वल कांबळे, महेश गाडे, नगरसेवक विजय चव्हाण, लखन आवळे, भाजप शहराध्यक्ष धनंजय म्हेञे, अनुसूचित जाती मोर्चाचे अजित गायकवाड यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी खा. शृंगारे यांनी रुग्णालयासाठी आवश्यक असलेल्या आरोग्यविषयक यंत्रसामग्रीची माहिती घेतली. तेव्हा डॉक्टरांनी तेथील यंत्रसामग्रीची माहिती दिली. अधिक यंत्रसामग्री उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगून कोविड रुग्णांना काळजीपूर्वक आरोग्य सेवा देण्याची सूचना केली.
===Photopath===
170521\img-20210517-wa0042.jpg
===Caption===
बावची येथील कोवीड केअर सेंटरला भेट देऊन पाहणी करताना खा. सुधाकर शृंगारे, रेणापूर तहसीलदार राहुल पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नारायण देशमुख