सगेसोयरे अध्यादेशासाठी लातुरात मराठा आंदोलकांकडून रास्ता रोको आंदोलन
By आशपाक पठाण | Published: February 24, 2024 12:50 PM2024-02-24T12:50:28+5:302024-02-24T12:51:21+5:30
ज्याच्या कुणबी म्हणून नोंदी सापडल्या आहेत त्यांनाही सुलभ पध्दतीने प्रमाणपत्र द्यावे अशा मागण्याही यावेळी करण्यात आल्या.
लातूर : मराठा समाजास कुणबी प्रमाणपत्र मिळावे यासाठी अधिसुचनेमधील सगेसोयरे याचा अद्यादेश शासनाने काढावा व त्याची अमलबजावणी करावी या मागणीसाठी शनिवारी सकाळी 10.30 वाजेपासून सकल मराठा समाजाच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.
बार्शी रोडवर पाच नंबर चौक, नांदेड रोडवरील गरुड चौकात सकाळी १०.३० ते १ या वेळेत आंदोलन करण्यात येत आहे. २५ फेब्रुवारी रोजी याच वेळेत छत्रपती चौक औसा रोड आणि रेणापूर नाका (अंबाजोगाई रोड) येथे हे आंदोलन होणार आहे.त्यानंतर येणाऱ्या दिवसांत आलटून पालटून याच वेळेत चौकांत हे आंदोलन केले जाईल, असे सांगण्यात आले.
लातूर इथं मराठा समाजाचं आंदोलन, रास्ता रोको करून वाहने रोखली #Latur#MarathaReservationpic.twitter.com/SH2YkFe0VA
— Lokmat (@lokmat) February 24, 2024
३ मार्चचा रस्ता रोको लातूर शहरातील मुख्य पाचही चौकात केला जाणार आहे. हैद्राबाद गॅझेट मधील उल्लेखाप्रमाणे मराठवाड्यातील सर्व मराठा समाजास सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे. ज्याच्या कुणबी म्हणून नोंदी सापडल्या आहेत त्यांनाही सुलभ पध्दतीने प्रमाणपत्र द्यावे अशा मागण्याही यावेळी करण्यात आल्या.
आत्मदहन करण्याचा प्रयत्न...
लातूर शहरातील बार्शी रोड वर दुपारी 12. 37 वाजण्याच्या सुमारास एका तरुणाने अंगावर रॉकेल ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, पोलिसांनी तत्काळ ताब्यात घेत एमआयडीसी पोलीस ठाण्यात नेले.