हत्तीबेटाजवळ अल्पवयीन मुलास लुटले, जिवे मारण्याची धमकी देत पैसे काढून घेतले; दोघांना अटक

By आशपाक पठाण | Published: September 15, 2023 01:13 AM2023-09-15T01:13:03+5:302023-09-15T01:14:09+5:30

याप्रकरणी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल झाला असून दोन अरोपीना अटक करण्यात आली आहे. 

Robbed a minor in udgir, extorted money by threatening to kill him; Both were arrested | हत्तीबेटाजवळ अल्पवयीन मुलास लुटले, जिवे मारण्याची धमकी देत पैसे काढून घेतले; दोघांना अटक

हत्तीबेटाजवळ अल्पवयीन मुलास लुटले, जिवे मारण्याची धमकी देत पैसे काढून घेतले; दोघांना अटक

googlenewsNext

उदगीर - तालुक्यातील देवर्जन येथे असलेल्या हत्तीबेट या पर्यटन स्थळाजवळ एका अल्पवयीन मुलास धमकी देऊन तिच्याकडील रोख रक्कम ३ हजार ४०० रुपये खिशातून जबरीने काढून घेतल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली आहे. याप्रकरणी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल झाला असून दोन अरोपीना अटक करण्यात आली आहे. 

फिर्यादी अजय बालाजी बिरादार (रा. निडेबन) व त्याचे मित्र मंगळवारी हत्तीबेट येथे गेले होते. तेव्हा त्या ठिकाणी कार्तीक पुलवाड (रा.देवर्जन ) व इतर अनोळखी दोघे यांनी संगणमत करून फिर्यादी व त्याच्या मित्रास जीवे मारण्याची धमकी देत त्यांच्याकडून खिशातील जबरीने एकूण ३ हजार ४०० रुपये काढून घेतले अशी तक्रार उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात देण्यात आली. या तक्रारीवरून गुरुवारी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या घटनेतील दोघा आरोपींना अटक करण्यात आल्याचे पोलीस उपनिरीक्षक तानाजी चेरले यांनी सांगितले.
 

Web Title: Robbed a minor in udgir, extorted money by threatening to kill him; Both were arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.