लातूर शहरात भरधाव टमटमची दुचाकीला धडक; तिघे जण जखमी

By राजकुमार जोंधळे | Published: September 26, 2022 08:39 AM2022-09-26T08:39:12+5:302022-09-26T08:39:36+5:30

चालकावर गुन्हा : पाण्याची टाकी येथील घटना

Rushing gig collides with bike in Latur city; Three people were injured | लातूर शहरात भरधाव टमटमची दुचाकीला धडक; तिघे जण जखमी

लातूर शहरात भरधाव टमटमची दुचाकीला धडक; तिघे जण जखमी

googlenewsNext

लातूर : भरधाव टमटमने दिलेल्या धडकेत तिघे जण जखमी झाल्याची घटना लातूर शहरातील बार्शी मार्गावरील पाण्याची टाकी येथे घडली. याबाबत एमआयडीसी पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी रविवारी दिली. 

पाेलिसांनी सांगितले, फिर्यादी सुवर्णा भागवत जाधव (वय ३८ रा. गाढवेवाडी ता. औसा) हे पती आणि मुलासाेबत माेटारसायकलवरुन (एम.एच. २४ ए.एम. ८७१२) जात हाेते. दरम्यान, गंजगाेलाईच्या दिशेने जात असताना अज्ञात टमटमच्या चालकाने हायगय व निष्काळजीपणे वाहन चालवत माेटारसायकलला पाठीमागून जोराची धडक दिली. या अपघातामध्ये फिर्यादी, पती आणि त्यांचा मुलगा जखमी झाला आहे.

याबाबत पाेलिसांना दिलेल्या जबाबावरुन एमआयडीसी पाेलीस ठाण्यात टमटम चालकाविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक मुळे करत आहेत.

Web Title: Rushing gig collides with bike in Latur city; Three people were injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.