भरधाव ट्रकची बसला धडक; २६ प्रवासी जखमी, लातूर-नांदेड महामार्गावरील घटना
By राजकुमार जोंधळे | Published: August 16, 2023 09:52 PM2023-08-16T21:52:00+5:302023-08-16T21:52:08+5:30
अपघातात बसमधील चार प्रवासी गंभीर असून, त्यांना उपचारासाठी लातूर, नांदेडला हलवले आहे.
अहमदपूर (जि. लातूर) : भरधाव ट्रकने बसला दिलेल्या जाेराच्या धडकेत चार प्रवासी गंभीर, तर २६ प्रवासी किरकाेळ जखमी झाल्याची घटना लातूर-नांदेड महामार्गावरील राळगा पाटीनजीक घडली. याबाबत अहमदपूर पाेलिस ठाण्यात ट्रकचालकाविराेधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
पाेलिसांनी सांगितले, नांदेडकडून लातूरच्या दिशेने निघालेल्या भरधाव ट्रकने (एम.एच. २६ डी. ई. ४५७६) लातूर-नांदेड महामार्गावरील राळगा पाटीनजीक बसच्या (एम.एच.२४ ए.यू. ८१६०) डाव्या बाजूला जोराची धडक दिली. ही घटना बुधवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली.
अपघातात बसमधील चार प्रवासी गंभीर असून, त्यांना उपचारासाठी लातूर, नांदेडला हलवले आहे. तर, आनंद जाधव (४५, रा. वसमत, जि. हिंगाेली ), नागनाथ बंगावार (५०, मरळक), ज्ञानेश्वर संगवर (२५, रा. नांदेड), अजय हाके (३२, रा. शिरनाळ), खाजा शेख (२९, रा. लातूर ), सुनील कुकर (४०, रा. तळेगाव घाट, आंबेजोगाई), सावित्राबाई शेळके (५०, रा. धानोरा), बालाजी भिसे (२७, रा. दाव्याची वाडी, हादगाव), नितीन मानखंडे (३२, रा. भाटसांगवी), गंगाप्रसाद खंडागळे (२९, रा. शिराढोण, ता. कंधार), लताबाई सूर्यवंशी (६०, रा. तळणी), संभाजी घुले (३०, रा. गुत्ती, ता. जळकोट) या जखमींवर अहमदपूरच्या ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी लातूर आणि नांदेडला हलविण्यात आले आहे. याबाबत अहमदपूर पोलिस ठाण्यात ट्रकचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
या जखमी प्रवाशांवर अहमदपुरात उपचार...
अपघातातील जखमी झालेल्या हनुमंत श्रीमंगले (६०, मरशिवणी), पूनम श्रीमंगले (२२, मरशिवणी), शिवराज देशमुख (२४, सोनखेड), मीना इबते (४०, रा. नांदेड), गंगाधर वंगलवाड (५०, रा. नांदेड), वैशाली जाधव (४५, रा. हिप्परगा, ता. बिलोली), छाया भालेराव (५९, रा. नांदेड), साहेबराव बामणे (२६, रा. नांदेड), लक्ष्मीबाई जाधव (६२, रा. कासारखेडा), विठ्ठलराव कदम (५२, रा. देगाव, ता. अर्धापूर), सुमन लडे (६०, देगाव ता. अर्धापूर), साक्षी भालेराव (१९, रा. नांदेड), दिलीप भालेराव (४५, रा. नांदेड), पूजा कोंडलवाडे (२५, रा. धानोरा), लक्ष्मी कदम (६०, देगाव, ता. अर्धापूर), मारुती आढाव (७०, रा. कासारखेडा), असलम शेख (२८, रा. शिंदगी खु.), रुक्मिणी कदम (६०, देगाव ता. अर्धापूर) यांच्यावर अहमदपूर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत, अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक डाॅ.दत्तात्रय बिराजदार, अहमदपूर आगार प्रमुख संताेषकुमार बिराजदार यांनी दिली.