सा. बां. विभागातील निवासस्थाने बांधकामासाठी ९ कोटींचा निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:13 AM2021-07-23T04:13:55+5:302021-07-23T04:13:55+5:30
उदगीर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांच्या निवासस्थानाचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. अधिकारी व कर्मचारी राहत असलेली ...
उदगीर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांच्या निवासस्थानाचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. अधिकारी व कर्मचारी राहत असलेली घरे अत्यंत खराब झाली होती. त्यामुळे या विभागातील अधिकारी व कर्मचारी यांची मोठी गैरसोय होत होती. या ठिकाणी नवीन व सर्व सोयी-सुविधाने युक्त असे निवासस्थान असावे, अशी मागणी प्रशासकीय स्तरावरून करण्यात येत होती. या मागणीला शासनाने हिरवा कंदील दाखविला असून, घरासाठी शासनाने ९ कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे. यामध्ये प्रामुख्याने अधिकारी व कर्मचारी यांचे ३२ निवासस्थान उभे राहणार आहेत. आधुनिक सोयी-सुविधासह पर्यावरणपूरक असे निवासस्थान असणार आहे. प्रशासकीय मान्यता मिळाली असून, लवकरच कामाला सुरुवात होणार असल्याचे राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी सांगितले.