देवणी बाजार समिती सभापतीपदी सदाशिव पाटील, उपसभापतीपदी दिलीप मजगे
By हरी मोकाशे | Published: May 25, 2023 06:41 PM2023-05-25T18:41:12+5:302023-05-25T18:41:44+5:30
भाजपाच्या पॅनलने १८ पैकी १६ जागा जिंकून एकहाती सत्ता मिळविली होती.
देवणी : देवणी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापतीपदी भाजपाचे सदाशिव रामचंद्रराव पाटील तळेगावकर यांची तर उपसभापतीपदी दिलीप शंकरप्पा मजगे यांची गुरुवारी बिनविरोध निवड झाली. या निवडीनंतर नूतन पदाधिकारी व संचालकांचा सत्कार करण्यात आला.
देवणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकांच्या निवडीसाठी गत महिन्यात निवडणूक झाली होती. या निवडणुकीत माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर, भाजपाचे प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर, भाजपाचे भगवान दादा पाटील तळेगावकर यांच्या नेतृत्वाखालील भाजपाच्या पॅनलने १८ पैकी १६ जागा जिंकून एकहाती सत्ता मिळविली. सभापती, उपसभापती पदाच्या निवडीकडे लक्ष लागले होते.
सभापतीपदी सदाशिव पाटील तळेगावकर तर उपसभापतीपदी दिलीप मजगे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक एस. एस. कुलकर्णी, प्रशासक बी.एस. नांदापूरकर, सहकार अधिकारी एस. एन. अहिंनवाड, सचिव सुनील कळसे यांनी काम पाहिले. या निवड बैठकीस १८ संचालक उपस्थित होते. या निवडीनंतर नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी निलंग्याचे चेअरमन दगडू साळुंखे, भगवान दादा पाटील तळेगावकर, काशिनाथ गरिबे, प्रशांत पाटील, वैजनाथ अष्टुरे, शंकरराव पाटील तळेगावकर, नागेश जीवने, किशोर निडवंचे, मनोहर पटणे, बाबुराव इंगोले, रामलिंग शेरे, अमर पाटील, चंद्रकांत महाजन, सत्यवान कांबळे, ओम धनुरे, राजकुमार गुणाले, विजयकुमार लुल्ले, बालाजी सूर्यवंशी, राजू पाटील, मल्लिकार्जुन डोंगरे, रमेश बेलुरे, रमेश मन्सुरे, गोपीनाथ सगर, परमेश्वर माने, सुधीर भोसले, विनोद मलशेटे, राजकुमार बिरादार आदी उपस्थित होते.