संत गाडगेबाबांनी कीर्तन, भारुडातून अंधश्रद्धा निर्मूलन केले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:21 AM2021-02-24T04:21:41+5:302021-02-24T04:21:41+5:30
येथील शहीद भगतसिंग महाविद्यालयात संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी प्रा. डॉ. डी.पी. कांबळे, प्रा.डॉ. ...
येथील शहीद भगतसिंग महाविद्यालयात संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी प्रा. डॉ. डी.पी. कांबळे, प्रा.डॉ. प्रशांत चव्हाण, प्रा. डॉ. देविदास भोयर, प्रा. डॉ. ज्ञानदेव राऊत, प्रा.डॉ. दैवशाला नागदे, प्रा.डॉ. संदीप चव्हाण, प्रा. डॉ. पांडुरंग मगर, प्रा. डॉ. नंदकुमार माने, प्रा. डॉ. विक्रम गिरी, जी.आर. सरवदे, सतीश शेळके, गौतम गायकवाड, सुग्रीव आकुलवाड, नागनाथ वाघमारे, प्रशांत शिंदे आदी उपस्थित होते.
यावेळी प्रा.डॉ. पवार म्हणाले, संत गाडगेबाबांनी सामाजिक न्याय, सुधारणा व स्वच्छता या त्रिसूत्रीचा आयुष्यभर अंगीकार करून समाजामध्ये प्रबोधन केले. आयुष्यभर त्यांनी समाजाला वैज्ञानिक दृष्टिकोन सांगितला. माणसांची सेवा करून माणसातच देव शोधला. सूत्रसंचालन रासेयोचे कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ. अशोक गायकवाड यांनी केले.