पगार कमी अन् व्यवसायात ताेटा... पाेटगी टाळाटाळीची कारणे वाढली..।

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:19 AM2021-08-01T04:19:31+5:302021-08-01T04:19:31+5:30

कारणे काय दिली जातात... काैटुंबिक न्यायालयाने मंजूर केलेली पाेटगी वेळेवर मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. काेराेनाचा काळ आहे. राेजगार ...

Salary is low and in business ... the reasons for avoiding pay have increased .. | पगार कमी अन् व्यवसायात ताेटा... पाेटगी टाळाटाळीची कारणे वाढली..।

पगार कमी अन् व्यवसायात ताेटा... पाेटगी टाळाटाळीची कारणे वाढली..।

Next

कारणे काय दिली जातात...

काैटुंबिक न्यायालयाने मंजूर केलेली पाेटगी वेळेवर मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. काेराेनाचा काळ आहे. राेजगार नाही, व्यवसाय बंद आहे. आहे त्याव व्यवसायात ताेटा झाला आहे. त्यामुळे पाेटगी देण्यासाठी अडचणी येत आहेत, अशी कारणे सांगितली जात आहे.

यासंदर्भात संबंधितांना न्यायालयाकडे समन्स बजावले जात आहेत. मात्र, काहींकडून ही पाेटगी भरताे, तर काहींकडून मी सध्या पाेटगी भरू शकणार नाही, अशी कारणे सांगितली जात आहेत.

काेराेनामुळे व्यवसायातील उलाढाल ठप्प आहे. बँकांचे हप्ते, इतरांचे कर्ज डाेक्यावर आहे. यासाठी सध्याला पाेटगी देणे शक्य नाही, असे कारण सांगितले जात आहे.

घटस्फाेटित - निराधार महिलांची हाेरपळ...

मंजूर झालेली पाेटगी वेळेवर मिळत नसल्याने काेराेना काळात अनेक घटस्फाेटित, निराधार महिलांची हाेरपळ सुरू झाली आहे. अशा स्थितीत जगण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. यातून जवळ असलेल्या लेकरांचेही हाल सुुरू आहेत.

- घटस्फाेटित महिला

यापूर्वीही मंजूर झालेल्या पाेटगीबाबत असाच चालढकलपणा केला जात हाेता. दरम्यान, याबाबत मी उदगीरच्या न्यायालयात धाव घेतली. पुन्हा काही दिवस पाेटगी देण्यात आली. मात्र, काेराेनाचे कारण पुढे करत पाेटगी देण्याबाबत टाळाटाळ केली जात आहे. यातून सध्या प्रपंचाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

- घटस्फाेटित महिला

Web Title: Salary is low and in business ... the reasons for avoiding pay have increased ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.