बनावट ले आऊट करून संस्थेच्या जमिनीची विक्री
By आशपाक पठाण | Published: December 13, 2023 08:06 PM2023-12-13T20:06:53+5:302023-12-13T20:07:09+5:30
आठ संचालकांसह चार खरेदीदारावर गुन्हा दाखल.
औराद शहाजानी (जि. लातूर) : निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी येथील एका नामांकित शिक्षण संस्थेच्या संचालकावर संस्थेच्या मालकीच्या जमिनीचे खोटे लेआउट बनवून प्लॉट विक्री केली. तसेच मिळालेली रक्कम संस्थेच्या खात्यावर जमा केली नसल्याने न्यायालयाच्या आदेशानुसार आठ संचालक व चार प्लॉट खरेदीदार यांच्यावर बुधवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
औराद शहाजानी पोलिस ठाण्यात फिर्यादी सुंदरलाल दरक यांनी दिलेल्या दोन वेगवेगळ्या फिर्यादीवरून प्रेमचंद बियाणी, मडोळ्या मठपती, दगडु गिरबने, रमेश बगदुरे, राजेश वलांडे, मतीन आळंदकर, किशन भिंगोले, शिवाजी जाधव या संचालकासह प्लॉट खरेदीदार बालाजी सूर्यवंशी, राम मरगणे, अरविंद ठाकूर, चुनगुद ठाकूर यांच्यावर औराद पोलिस ठाण्यात दोन वेगवेगळ्या फिर्यादीवरून विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज शिनगारे करीत आहेत.