मयताच्या नावाने बनावट दस्तऐवज करून प्लॉटची विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:19 AM2021-09-25T04:19:51+5:302021-09-25T04:19:51+5:30

पोलिसांनी सांगितले, फिर्यादी सय्यद नजमुद्दीन अमिरुद्दीन खतीब यांची वडिलोपार्जित शेतजमीन बिदर रोड उदगीर येथे आहे. त्या जमिनीचा फिर्यादीच्या वडिलांनी ...

Sale of plot by forging documents in Mayata's name | मयताच्या नावाने बनावट दस्तऐवज करून प्लॉटची विक्री

मयताच्या नावाने बनावट दस्तऐवज करून प्लॉटची विक्री

Next

पोलिसांनी सांगितले, फिर्यादी सय्यद नजमुद्दीन अमिरुद्दीन खतीब यांची वडिलोपार्जित शेतजमीन बिदर रोड उदगीर येथे आहे. त्या जमिनीचा फिर्यादीच्या वडिलांनी व चुलत्यांनी १९७५ साली जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांच्याकडून अकृषी करून घेतला होता व प्लॉटिंग केली होती. त्यापैकी सर्व्हे क्र. ३०८/ ४ मधील प्लॉट क्र. १०७ हा फिर्यादीच्या नावावर होता. परंतु, आरोपी अब्दुल अजीम गुलाम, मोहम्मद मुख्तार खान जब्बार, अब्दुल खादर चौधरी (सर्वजण रा. उदगीर) यांनी बनावट दस्तऐवज तयार करून १९९९ साली फिर्यादीचे वडील व चुलते मयत असतानाही खरेदीखत करून घेतले आणि २०१८ मध्ये नगर परिषद येथे कार्यालयाची दिशाभूल करून अब्दुल खादर मोहमद युसूफ चौधरी याने स्वतःच्या नावावर करून घेतले. नामांतर करून घेऊन हा प्लॉट पुढे २०१९ मध्ये विक्री केला, अशी तक्रार उदगीर शहर पोलीस ठाण्यात दिल्याने तिघांविरुध्द विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एस. बी. खेडकर हे करीत आहेत.

Web Title: Sale of plot by forging documents in Mayata's name

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.