सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे समाज कल्याण आयुक्तांना साकडे
By हणमंत गायकवाड | Published: March 13, 2024 05:44 PM2024-03-13T17:44:24+5:302024-03-13T17:44:41+5:30
वसतिगृहातील विद्यार्थ्यांना निर्वाह भत्त्यासह शैक्षणिक साहित्य द्या
लातूर : शासकीय वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना निर्वाह भत्त्यासह स्टेशनरी, ड्रेस कोडची रक्कम तत्काळ देण्यात यावी, या व अन्य मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडी प्रणित सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने समाज कल्याण विभागाच्या सहायक आयुक्तांना बुधवारी साकडे घातले. या आंदोलनात सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
लातूर शहरासह जिल्ह्यात सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. वसतिगृहात राहणाऱ्या या मुलांना स्टेशनरी, ड्रेस कोड, निर्वाह भत्ता देण्यात यावा. याशिवाय स्व-आधार योजनेचा अर्ज भरण्यासाठी तारीख वाढवून देण्यात यावी,अशी मागणी सामाजिक न्याय विभागाचे आयुक्त एस.एन. चिकुर्ते यांच्याकडे विद्यार्थ्यांनी केली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे झालेल्या या आंदोलनात रत्नदीप सोमासे, रोहन सावंत, ऋतिक सुरवसे, प्रीतम दंडे, रजनीकांत सूर्यवंशी,आशिष कांबळे, आदित्य अल्टे,योगेश कांबळे, प्रेम गोबाळे, सुरज कांबळे, किरण कांबळे, सचिन खरात, श्रीकांत सरवदे, प्रथमेश येळे,रवी इंगळे, अजहर तांबोळी,आदित्य डोळसे अशिष धनुर्वेद, विशाल बनाळे, दिनेश चक्रे, प्रकाश बाडोले, दीपक काळेवार, बाबासाहेब ढवळे, विशाल कांबळे आदी पदाधिकारी सहभागी झाले होते.