पाटोदा येथे स्वच्छतेचा जागर सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:21 AM2021-02-24T04:21:26+5:302021-02-24T04:21:26+5:30
तालुक्यातील गावा- गावांमध्ये स्वच्छतेचा जागर घालण्यात येत आहे. दरम्यान, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी चंद्रहार ढोकणे हे पत्नीसोबत आपल्या कार्यालयातील ...
तालुक्यातील गावा- गावांमध्ये स्वच्छतेचा जागर घालण्यात येत आहे. दरम्यान, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी चंद्रहार ढोकणे हे पत्नीसोबत आपल्या कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांसोबत घेऊन सुंदर माझे कार्यालय, सुंदर माझे गाव मोहिमेची प्रत्यक्ष अंमलबजावणी व्हावी म्हणून पाटोदा (बु.) येथे सकाळीच दाखल झाले. त्यानंतर त्यांनी गाव स्वच्छतेसाठी श्रमदान केले. यावेळी हर घर में जल का नल, हगणदरीमुक्त गाव या मोहिमेचा प्रसार होण्यासाठी जनजागृती केली. गावातील अर्धवट कामांना भेटी देऊन लवकर ही कामे लवकर पूर्ण करण्याच्या सूचना केल्या. घरकुल बांधकाम व इतर कामांची त्यांनी पाहणी केली. यावेळी विस्तार अधिकारी दयानंद घंटेवाड, श्रीनिवास पाटील, एस. एस. लाखाडे, जी.डी. तिकटे, एस.डी. क्षीरसागर, सईद लाटवाले, रामदास नागरगोजे, बाबूराव गुट्टे , उपसरपंच शिवसांब वाडकर, रामदास केंद्रे, बालाजी दाडगे, सुनील पवार, श्रीराम बन यांची उपस्थिती होती.