देवणी तालुक्यात शुक्रवारपासून सरपंच़ उपसरपंच निवडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 06:21 AM2021-02-05T06:21:18+5:302021-02-05T06:21:18+5:30

शुक्रवारी (दि. ५) हंचनाळ, अजनी, होनाळी, कमालवाडी, नेकनाळ, विळेगाव येथील सरपंच उपसरपंच निवड केली जाणार आहे. सोमवारी (दि. ८) ...

Sarpanch Deputy Sarpanch elected in Devani taluka from Friday | देवणी तालुक्यात शुक्रवारपासून सरपंच़ उपसरपंच निवडी

देवणी तालुक्यात शुक्रवारपासून सरपंच़ उपसरपंच निवडी

Next

शुक्रवारी (दि. ५) हंचनाळ, अजनी, होनाळी, कमालवाडी, नेकनाळ, विळेगाव येथील सरपंच उपसरपंच निवड केली जाणार आहे. सोमवारी (दि. ८) वलांडी, जवळगा, देवणी (खु,), सिंधीकामठ, लासोना तर मंगळवार (दि. ९) संगम, सावरगाव, भोपणी, कोनाळी, तळेगाव (भो), कवठाळा तर बुधवारी (दि. १०) गुरधाळ, धनेगाव, गुरनाळ, गौंडगाव, आंबेगाव या गावांच्या निवडी होणार आहेत.

गुरुवार (दि. ११) वागदरी, आनंदवाडी, माणकी, नागराळ, कमरोद्दीनपूर, अचवला तर शुक्रवार (दि. १२) बोळेगाव, अंबानगर, इंद्राळ, बटनपूर, अनंतवाडी या गावांच्या निवडी होणार असल्याचे तालुका निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार सुरेश घोळवे यांनी सांगितले. सदर निवड प्रक्रिया त्या-त्या गावांसाठी नियुक्त केलेल्या निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक यांच्या उपस्थितीत पूर्ण होणार आहे.

काही ठिकाणच्या निवडी लक्षवेधी....

ग्रामपंचायत निवडणूक निकालानंतर बहुतांश गावांत काटावरचे निकाल लागले आहेत. एखाद्या उमेदवाराच्या अदला-बदलीमुळे सरपंच, उपसरपंचपदाची निवड लक्षवेधी ठरणार आहे. काही गावात एका पॅनेलकडे बहुमत आहे. मात्र, आरक्षित प्रवर्गाचा उमेदवार त्याच्याकडे नसल्याने आणि तो विरोधकाकडे असल्याने त्याचीही वर्णी लागण्याची शक्यता आहे. सर्वसाधारण जागेवर निवडून आला असला तरी त्याच्याकडे त्या प्रवर्गातील जातीचे प्रमाणपत्र असेल तर तोही आरक्षित जागेवरील सरपंचपदाचा दावेदार होऊ शकतो, असे तहसीलदार सुरेश घोळवे यांनी सांगितले.परिणामी, सर्वांच्या नजरा आता सरपंच,उपसरपंच निवडीकडे लागल्या आहेत.

Web Title: Sarpanch Deputy Sarpanch elected in Devani taluka from Friday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.