अतनूर, सुल्लाळी, बोरगाव, शिवाजीनगर तांड्याचे सरपंचपद खुले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 06:22 AM2021-02-05T06:22:31+5:302021-02-05T06:22:31+5:30
जळकोट : तालुक्यातील ४३ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण शुक्रवारी जाहीर करण्यात आले. अतनूर, सुल्लाळी, बोरगाव, शिवाजीनगर तांडा येथील सरपंचपद खुले ...
जळकोट : तालुक्यातील ४३ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण शुक्रवारी जाहीर करण्यात आले. अतनूर, सुल्लाळी, बोरगाव, शिवाजीनगर तांडा येथील सरपंचपद खुले झाले आहे.
उपजिल्हाधिकारी प्रवीण मेंगशेट्टी, तहसीलदार संदीप कुलकर्णी यांच्या उपस्थितीत गणपत कोकणे या मुलाच्या हस्ते चिठ्ठी काढून आरक्षण सोडत काढण्यात आली. यावेळी गटविकास अधिकारी चंद्रहार ढोकणे, नायब तहसीलदार राजा खरात, रऊफ शेख, अजिम शेरवाले, युवराज करेप्पा आदी उपस्थित होते. अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गासाठीचे आरक्षण पूर्वीप्रमाणे ठेवण्यात आले आहेत.
अनुसूचित जाती प्रवर्ग : सोनवळा, कोनाळी डोंगर, होकर्णा, पाटोदा बु., घोणसी, मरसांगवी. अनुसूचित जाती प्रवर्ग महिला : ढोरसांगवी, कुणकी, केकतसिंदगी, मंगरुळ, वडगाव, अनुसूचित जमाती प्रवर्ग : हावरगा.
नागरिकांचा मागास प्रवर्ग पुरुष : लाळी बु., उमरगा रेतू, धामणगाव, शेलदरा, एकुर्गा खु.. येवरी, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला : तिरुका, रामपूर तांडा, लाळी खु. उमरदरा, हळद वाढवणा, पाटोदा खु..
विराळ, गुत्ती येथे येणार महिलाराज...
खुला प्रवर्ग पुरुष : बेळसांगवी, सुल्लाळी, चेरा, अतनूर, बोरगाव खु., शिवाजीनगर तांडा, वांजरवाडा, करंजी, महिला : विराळ, गुत्ती, येलदरा, डोंगरगाव, माळहिप्परगा, जगळपूर, कोळनूर, मेवापूर, चिंचोली, रावणकोळा.
तालुक्यातील वडगाव येथे विजयी झालेल्या सदस्यांमध्ये एकही अनुसूचित जाती प्रवर्गातील महिला नाही. मात्र, तेथील सरपंच पदाचे आरक्षण हे अनुसूचित जाती महिलेसाठी राखीव आहे. तालुक्यातील ४३ पैकी २१ ग्रामपंचायतींवर महिला सरपंच होणार आहेत.