नळेगाव, आष्टा, जानवळ, बोथीचे सरपंचपद खुले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 06:22 AM2021-02-05T06:22:28+5:302021-02-05T06:22:28+5:30

आरक्षणाच्या चिठ्ठ्या श्रद्धा संजय चाफळे या मुलीच्या हस्ते काढण्यात आल्या. यावेळी उपविभागीय अधिकारी प्रभोदय मुळे, तहसीलदार डॉ. शिवानंद बिडवे, ...

Sarpanch posts of Nalegaon, Ashta, Janwal and Bothi are open | नळेगाव, आष्टा, जानवळ, बोथीचे सरपंचपद खुले

नळेगाव, आष्टा, जानवळ, बोथीचे सरपंचपद खुले

googlenewsNext

आरक्षणाच्या चिठ्ठ्या श्रद्धा संजय चाफळे या मुलीच्या हस्ते काढण्यात आल्या. यावेळी उपविभागीय अधिकारी प्रभोदय मुळे, तहसीलदार डॉ. शिवानंद बिडवे, नायब तहसीलदार बालाजी चितळे, ई.व्ही. बुवा, अंगद कासले, तलाठी एन.जी. खंदाडे उपस्थित होते. अनुसूचित जाती पुरुष : महाळंगी, महाळंग्रा, महांडोळ, रोहिणा, लातूररोड, वडवळ नागनाथ, शिवणी म., अनुसूचित जाती प्रवर्ग महिला : अजनसोंडा बु., घरणी, बनसावरगाव, बोळेगाव खु., मोहनाळ, शिवणखेड बु., सुगाव तर अनुसूचित जमाती महिला प्रवर्गासाठी वडगाव ए., अनुसूचित जमाती प्रवर्गातील पुरुषासाठी हणमंत जवळगा येथील सरपंचपद आरक्षित झाले आहेत.

नागरिकांचा मागास प्रवर्ग पुरुष : कलकोटी, गांजूर, चापोली, तीर्थवाडी, देवंग्रा, बेलगाव, ब्रह्मवाडी व., मुरंबी, रामवाडी, डोंग्रज, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला : अंबुलगा, अलगरवाडी, उजळंब, केंद्रेवाडी, गांजूरवाडी, तिवटघाळ, दापक्याळ, मांडुरकी, शेळगाव.

आटोळा, आनंदवाडी, अजनसोंडा बु. खुले...

अजनसोंडा बु., आटोळा, आनंदवाडी, आष्टा, जढाळा, जानवळ, बावलगाव, नांदगाव, बोरगाव बु., नळेगाव, नागदरवाडी, शिरनाळ, बोथी, मष्नेरवाडी, मोहदळ, लिंबाळवाडी, वाघोली, हिप्पळनेर येथील सरपंचपद हे सर्वसाधारणसाठी खुले झाले आहे. तसेच महाळंग्रावाडी, कडमुळी, कबनसांगवी, कवठाळी, घारोळा, जगळपूर खु., झरी बु., टाकळगाव, तिवघाळ, झरी खु., नागेशवाडी, नायगाव, ब्रह्मवाडी य., भाटसांगवी, राचन्नावाडी, रायवाडी, हाडोळी, हाळी खु. येथील सरपंचपद हे सर्वसाधारण प्रवर्गातील महिलेसाठी राखीव झाले आहेत.

Web Title: Sarpanch posts of Nalegaon, Ashta, Janwal and Bothi are open

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.