सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:19 AM2021-01-23T04:19:44+5:302021-01-23T04:19:44+5:30

२९ जानेवारी रोजी सकाळी १०.३० वाजता लातूर, औसा, निलंगा, उदगीर, अहमदपूर, चाकूर तालुक्यांची सोडत जाहीर होणार आहे. तर दुपारी ...

Sarpanch reservation draw program announced | सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर

सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर

Next

२९ जानेवारी रोजी सकाळी १०.३० वाजता लातूर, औसा, निलंगा, उदगीर, अहमदपूर, चाकूर तालुक्यांची सोडत जाहीर होणार आहे. तर दुपारी ३ वाजता रेणापूर, शिरूर अनंतपाळ आणि जळकोट तालुक्याची सोडत काढली जाणार आहे. देवणी तालुक्याची सोडत १ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.३० वाजता जाहीर केली जाणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करणे बंधनकारक राहणार असून, उपविभागीय अधिकारी तहसीलदार यांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक यांनी केले आहे.

विजयी उमेदवारांना होती सोडतीची प्रतीक्षा

१८ जानेवारी रोजी ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल जाहीर झाला होता. तेव्हापासून गावा-गावांत सोडत कधी निघणार याची चर्चा होती. अखेर शुक्रवारी सोडतीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे.

Web Title: Sarpanch reservation draw program announced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.