जिजामाता विद्या संकुलात सावित्रीबाई फुले जयंती साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:01 AM2021-01-08T05:01:14+5:302021-01-08T05:01:14+5:30
समता विद्यालयात अभिवादन कार्यक्रम लातूर : तालुक्यातील जोडजवळा येथील समता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या ...
समता विद्यालयात अभिवादन कार्यक्रम
लातूर : तालुक्यातील जोडजवळा येथील समता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी वैशाली कांबळे, प्राचार्य किसन बिरादार, कमलाकर काळे, विनायक सोळंके, शंकर पंडित, शालिग्राम जिरंगे, अश्विन कांबळे, शिवाजी राठोड, महादेव पिटलेवाड, सिद्धेश्वर उकिरडे आदींसह शिक्षक, कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेवर कार्यशाळा
लातूर : राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेवर जिल्हा नियोजन समिती सभागृहात कार्यशाळा पार पडली. यावेळी सेवानिवृत्तीनंतर प्रकरण मंजुरीस्तव सादर करणे, कागदपत्रांची कार्यवाही, सानुग्रह अनुदान आदी विषयांवर जिल्हा कोषागार अधिकारी राधाकिशन राऊत, एस.डी. सूर्यवंशी, जी.एस. कांबळे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमास एस.डी. तारळकर, वाजिद सय्यद, बी.टी. शिखरे, रामचंद्र गुरव, एम.एन. परळकर, एस.बी. बिरादार उपस्थित होते.
इच्छुक शेतकऱ्यांनी अर्ज करावेत
लातूर : एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान २०२०-२१ अंतर्गत फळपीक लागवड, फुलपीक लागवड, मशरुम, हरितगृह, शेतकरी अभ्यास दौरा, सामूहिक शेततळे, वैयक्तिक शेततळे अस्तरीकरण, कांदाचाळ, पॅक हाऊस आदी घटकांसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज भरण्यास ११ जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आली असून, इच्छुक शेतकऱ्यांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी केले आहे.
दर्पण दिनानिमित्त ऑनलाइन कार्यशाळा
लातूर : जिल्हा माहिती कार्यालय, राजर्षी शाहू महाविद्यालय, जनसंज्ञापन आणि वृत्तविद्या विभाग, आरोग्य सेवा उप-संचालक यांच्या संयुक्त विद्यमाने ६ जानेवारी रोजी आरोग्य पत्रकारिता : लेखन कौशल्य ऑनलाइन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये आरोग्यविषयक पत्रकारिता यावर मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत. सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे.