अवैध दारूचा साठा जप्त; १८ जणांना पाेलिसी झटका !
By राजकुमार जोंधळे | Published: February 20, 2023 07:18 PM2023-02-20T19:18:05+5:302023-02-20T19:18:24+5:30
पाेलिसांचे छापासत्र : तीन लाखांचा मुद्देमाल लागला हाती...
लातूर : जिल्ह्यातील औसा, अहमदपूर आणि चाकूर तालुक्यात विशेष पाेलिस पथकांनी ठिकठिकाणी छापा मारला असून, गत आठ दिवसांपासून हे छापासत्र सुरूच आहे. यावेळी अवैध दारूविक्री करणाऱ्या १८ जणांना पाेलिस पथकांनी खाक्या दाखविला असून, सहा जणांना अटक केली. याबाबत त्या-त्या पाेलिस ठाण्यात स्वतंत्र १६ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
रविवारी काहीजण देशी-विदेशी दारूची चाेरट्या मार्गाने विक्री करत आहेत, अशी माहिती पाेलिस पथकाला मिळाली. याच्या आधारावर चाकूर, अहमदपूर तालुक्यात छापा मारला. यावेळी देशी दारूची चोरट्या मार्गाने वाहतूक करताना आढळून आले. देशी दारूचा साठा करून ठेवणाऱ्या १२ जणांवर पथकाने कारवाई केली. त्यांच्याकडून देशी-विदेशी दारूचा साठा असा २ लाख ८४ हजार ११० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यात अहमदपूर आणि चाकूर येथील प्रत्येकी एका बारवर कारवाई केली आहे. अहमदपूर येथे दारूसह कोयता जप्त केला. याबाबत अहमदपूर, किनगाव, वाढवणा (बु.), चाकूर, रेणापूर, शिरुर अनंतपाळ पाेलिस ठाण्यात सुरेश कचरु वाघमारे (२८, रा. शिरुर ताजबंद, ता. अहमदपूर), पांडुरंग बापूराव केंद्रे (६०, रा. अहमदपूर), संग्राम नामदेव कांबळे (३४, रा. अहमदपूर), माधव भगवान कांबळे (३२, रा. अहमदपूर), राम लिंबाजी पवार (४७, रा. अहमदपूर), शाहरुख मकसूद शेख (२३, रा. अहमदपूर), समद बाबू बागवान (४२, रा. किनगाव), माणिक सखाराम गुंडरे (५३, रा. वाढवणा, ता. उदगीर), संतोष पंढरी एकरूपे (३०, रा. कोदळी, ता. उदगीर), राममूर्ती बुरा (४०, रा. चाकूर), ज्ञानोबा पंडित पलमटे (३३, रा. पाथरवाडी, ता. रेणापूर), मंगेश अनिल नामदेव (३०, रा. शिरुर अनंतपाळ) यांच्या विराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
औसा येथेही सहा जणांवर कारवाई...
रविवारी अवैध दारूविक्री करत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार औसा हद्दीत ठिकठिकाणी छापा मारण्यात आला. देशी-विदेशी दारुसह ३६ हजार ३६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत औसा ठाण्यात महादू गौतम चाबुकस्वार (३०), अशोक शिवराम चाबुकस्वार (५९), ओम प्रकाश दत्तात्रेय मसलकर (३०, तिघे रा. नागरसोगा, ता. औसा), रावण तुकाराम गायकवाड (६५), दत्ता बब्रुवान मांजरे (२४), व्यंकट नारायण ढोले (६५, तिघे रा. बोरफळ) यांच्या विराेधात गुन्हा दाखल केला आहे.