बचतगट हा सामाजिक आर्थिक उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:22 AM2021-09-26T04:22:41+5:302021-09-26T04:22:41+5:30
उमेद महाराष्ट्र राज्य जीवनोन्नती अभियानच्या तालुका कक्षाच्यावतीने येथील पंचायत समिती सभागृहात आयोजित प्रेरकांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. या ...
उमेद महाराष्ट्र राज्य जीवनोन्नती अभियानच्या तालुका कक्षाच्यावतीने येथील पंचायत समिती सभागृहात आयोजित प्रेरकांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अभियानचे तालुका व्यवस्थापक श्रीकांत श्रीमंगले होते. यावेळी संतोष भुताळे, प्रभाग समन्वयक धनाजी भोसले, शिबिर समन्वयक गणेश मुंडे उपस्थित होते. या बैठकीत नवीन गट स्थापना, गटाचे खाते काढणे, बँक कर्जवाटप, पीएमजेजेबीवाय, पीएमएसबीवाय, एपीवाय आदींचा आढावा घेण्यात आला.
यावेळी डॉ. लखोटिया यांनी उदयगिरी लाॅयन्स नेत्र रूग्णालयामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती देऊन मार्गदर्शन केले. बचत गटाच्या माध्यमातून गावस्तरावर मोफत नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात यावे आणि आपले गाव अंधत्वमुक्त करावे, असे आवाहनही त्यांनी केले. सूत्रसंचालन संतोष भुताळे यांनी केले तर धनाजी भोसले यांनी आभार मानले.