‘वैयक्तिक घरकुलांसाठी प्रस्ताव पाठवा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:13 AM2021-07-23T04:13:52+5:302021-07-23T04:13:52+5:30
फळपीक लागवडीसाठी पोर्टलवर अर्ज लातूर : ड्रायफ्रुट्स फळपीक लागवडीसाठी शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज सादर करावेत. एकात्मिक फलोत्पादन विकास ...
फळपीक लागवडीसाठी पोर्टलवर अर्ज
लातूर : ड्रायफ्रुट्स फळपीक लागवडीसाठी शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज सादर करावेत. एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत २०२१-२२ करिता संगणक प्रणालीवर ड्रॅगन फ्रुट या पिकांचे अर्ज घेण्यात येत आहेत. या फळामध्ये अधिक प्रमाणात पोषक तत्व आणि ॲण्टी ऑक्सिजनडंटमुळे फळास सुपर फ्रुट असून, औषधी गुणधर्म आहेत. त्यामुळे अर्ज करावेत.
कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले
लातूर : लातूर जिल्ह्यात आतापर्यंत ९१ हजार ९५ रुग्ण आढळले. त्यापैकी ८८ हजार ५६१ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.२२ टक्के आहे. तर दैनंदिन पाॅझिटिव्हिटी रेट ३ टक्क्यांच्या खाली आहे. शासनाने ठरविलेले स्तर आहेत. त्या स्तरात लातूर पहिल्या स्तरात आहे. त्यानुसार जिल्ह्यात निर्बंध शिथिल झालेले आहेत. तरीपण काळजी घेण्याचे आवाहन आहे.