सेवा विस्कळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2020 04:17 AM2020-12-08T04:17:14+5:302020-12-08T04:17:14+5:30
... वाहतुकीची अडचण निलंगा : शहरातील काही भागात बांधकामे सुरु आहेत. बांधकामधारक रस्त्यावर विटा, वाळू, सळई असे साहित्य टाकल्याने ...
...
वाहतुकीची अडचण
निलंगा : शहरातील काही भागात बांधकामे सुरु आहेत. बांधकामधारक रस्त्यावर विटा, वाळू, सळई असे साहित्य टाकल्याने ये- जा करताना नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. किमान ये- जा करण्यासाठी पायवाट तरी असणे अपेक्षित असतानाही त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे.
...
रब्बीचा पेरा वाढला
अहमदपूर : तालुक्यातील जलसाठ्यात वाढ झाल्याने यंदा रब्बी हंगामातील हरभऱ्याच्या पेऱ्यात वाढ झाली आहे. तालुक्यात आतापर्यंत १९० टक्के पेरा झाल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे.
...
शेतकऱ्यांची कसरत
पानगाव : पानगाव परिसरातील शेतकऱ्यांनी रब्बीच्या पेरण्या केल्या आहेत. पोषक वातावरणामुळे ही पिके चांगली वाढली आहेत. सध्या पाण्याची आवश्यकता असताना कृषी पंपांना वीजपुरवठा सुरळीत होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना रात्रभर जागून पाणी द्यावे लागत आहे. महावितरणने याकडे लक्ष देण्याची मागणी आहे.
...
जलवाहिनीची मागणी
लातूर : शहरानजीकच्या बार्शी रोडवरील व्हॉल्ववर नवीन वस्तीतील नागरिक पाण्यासाठी सतत रांगा लावत आहेत. नवीन वस्तीत पाण्याची सुविधा नसल्याने नागरिकांची अडचण होत आहे. प्रशासनाने याकडे लक्ष देऊन ही समस्या दूर करावी, अशी मागणी सातत्याने करण्यात येत आहे.