सांडपाणी घनकचरा व्यवस्थापन काळाची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2021 04:09 AM2021-01-24T04:09:18+5:302021-01-24T04:09:18+5:30
निलंगा तालुक्यातील पानचिंचोली येथे गृहभेटी तसेच गावफेरी कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी किशोर काळे, कार्यकारी ...
निलंगा तालुक्यातील पानचिंचोली येथे गृहभेटी तसेच गावफेरी कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी किशोर काळे, कार्यकारी अभियंता बाळासाहेब शेलार, गटविकास अधिकारी अमोल ताकभाते, शाखा अभियंता अघोर, संवादतज्ज्ञ उध्दव फड, शालेय स्वच्छता तज्ज्ञ चांगदेव डोपे, सरपंच श्रीकांत साळुंखे, ग्रामसेवक दत्ता पुरी यांची उपस्थिती होती. सीईओ गोयल म्हणाले, घनकचरा म्हणजे रोजच्या वापरातून उरलेला निरुपयोगी पदार्थ. ग्रामीण भागापेक्षा शहरी भागातून निघणारा घनकचरा व त्याची विल्हेवाट ही गावांपुढची एक मोठी समस्या आहे. ती दूर करण्यासाठी घनकचऱ्याचे परिणामकारक व्यवस्थापन तीन तत्त्वांवर अवलंबून आहे. अनेक प्रकारचा कचरा वेगवेगळया समस्या निर्माण करतो. आजार, प्रदूषण, सौंदर्यहानी आणि पर्यावरणाचे नुकसान असे अनेक प्रश्न निर्माण होतात. म्हणूनच घनकचरा व्यवस्थापन करताना काही उद्दिष्टे आपण लक्षात ठेवायला पाहिजेत. संपूर्ण स्वच्छतेसाठी कचरा व्यवस्थापन हा एक महत्त्वाचा घटक आहे. आपल्या केरकचऱ्यात विविध पदार्थ असतात; त्यात वर्गवारी करावी लागते. वर्गवारी केल्याशिवाय घनकचरा व्यवस्थापन चांगल्या प्रकारे होऊ शकणार नाही. त्यामुळे आपला परिसर आणि गाव स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी सर्वानींच परिश्रम घेणे गरजेचे असल्याचेही सीईओ गोयल म्हणाले. यावेळी पानचिंचोलीसह परिसरातील नागरिकांची उपस्थिती होती.