नागरी सुविधांसाठी ग्रामपंचायतीमध्ये युवकांचे मुंडण आंदोलन
By संदीप शिंदे | Published: October 21, 2023 05:33 PM2023-10-21T17:33:36+5:302023-10-21T17:34:00+5:30
वारंवार मागणी व निवेदन देऊनही ग्रामपंचायत प्रशासन दखल घेत नसल्याचा ग्रामस्थांचा आरोप
चापोली : येथील युवकांनी नागरी सुविधा उभारण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनास मुंडण आंदोलनाचे निवेदन दिले होते. त्याची दखल न घेतल्याने शनिवारी ग्रामपंचायत प्रशासनाच्या निषेधार्थ युवकांनी ग्रामपंचायत कार्यालयात मुंडण करून निषेध केला.
ग्रामपंचायतीस वारंवार लेखी निवेदन देऊनही वाॅर्डअंतर्गत रस्त्यावरील सांडपाणी बंद होत नाही. तसेच सार्वजनिक स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याची मागणी करूनही रस्ता होत नाही. गत तीन वर्षांपासून गावातील आरओ फिल्टर बंद आहे, गावाला पाणीपुरवठा करणारी पाइपलाइन फुटून पिण्याच्या पाण्याचा अपव्यय होत आहे, तसेच कूपनलिकेच्या पाण्याची गळती होत असून, ग्रामपंचायतच्या दुर्लक्षामुळे विकासाला खीळ बसली आहे. वारंवार मागणी व निवेदन देऊनही ग्रामपंचायत प्रशासन दखल घेत नसल्याने युवकांनी सोमवारी ग्रामविकास अधिकारी संतोष कुरुळेकर यांना मुंडण आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला होता. मात्र, दखल घेतली नसल्याने रविवारी मुंडण आंदोलन करण्यात आले.
यावेळी बस्वराज होनराव, प्रद्युम्न चाटे, नरसिंग शेवाळे, आकाश चाटे, भागवत शंकरे, व्यंकटेश चाटे, देविदास जगदाळे, मारोती पाटील, अमोल उळागड्डे आदी उपस्थित होते.