पावसाचा कहर! शेडाेळ-तुपडी पूल पाण्याखाली; पुरात वाहून गेलेले दाेघे बचावले, एकाचा शोध सुरु

By राजकुमार जोंधळे | Published: September 10, 2022 06:45 PM2022-09-10T18:45:37+5:302022-09-10T18:46:50+5:30

एनडीआरएफच्या पथकाकडून शाेध माेहिम सुरु...

Shedel-Tupdi bridge under water due to heavy rain; Two rescued in flood, search for one | पावसाचा कहर! शेडाेळ-तुपडी पूल पाण्याखाली; पुरात वाहून गेलेले दाेघे बचावले, एकाचा शोध सुरु

पावसाचा कहर! शेडाेळ-तुपडी पूल पाण्याखाली; पुरात वाहून गेलेले दाेघे बचावले, एकाचा शोध सुरु

googlenewsNext

लातूर : निलंगा तालुक्यातील शेडाेळ ते तपडी मार्गावरील पुलावरुन पाणी वाहत असल्याने वाहतूक ठप्प आहे. दरम्यान, या पुराच्या पाण्यात वाहून गेलेले दाेघे जण बचावले असून, एकाचा शाेध सुरु आहे. तर एनडीआरएफ पथकाच्या शाेधमाेहिमेत वाहून जाणारी माेटारसायकलचा शाेध लागला आहे. तर अन्य एकाचा सायंकाळपर्यंत शाेध सुरुच हाेता. 

निलंगा तालुक्यातील शेडाेळ परिसराला शनिवारी सकाळी मुसळधार पावसाने झाेडपले आहे. परिणामी, शेडाेळ ते तुपडी मार्गावर असलेला पूल ओढ्याच्या पाण्याखाली गेला आहे. या मार्गावरील वाहतूक सकाळपासूनच ठप्प झाली. पाण्याचा अंदाज न आल्याने दाेघांनी पुल ओलांडण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाण्याचा प्रवाह एवढा माेठा हाेता की, ते दाेघे वाहून गेले. यामध्ये दाेघेही बचावले आहेत. अन्य एक २६ वर्षी तरुण वाहून गेला असून, त्याचा एनडीआरएफच्या पथाककडून शाेध घेतला जात आहे. 

सायंकाळच्या सुमारास वाहून गेलेली माेटारसायल मात्र त्यांच्या हाती लागली आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून निलंगा तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. परिणामी, ओढे, नाल्यासह नदीला माेठ्या प्रमाणावर पूर आला आहे.

Web Title: Shedel-Tupdi bridge under water due to heavy rain; Two rescued in flood, search for one

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.