दारूबंदीसाठी शेंदच्या महिला सरसावल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:44 AM2021-09-02T04:44:22+5:302021-09-02T04:44:22+5:30
शेंद गावात अवैध दारू विक्रीचे प्रमाण वाढले असून, त्यामुळे युवक दारूच्या आहारी जात आहेत. तसेच गावात तळीरामांची संख्याही वाढली ...
शेंद गावात अवैध दारू विक्रीचे प्रमाण वाढले असून, त्यामुळे युवक दारूच्या आहारी जात आहेत. तसेच गावात तळीरामांची संख्याही वाढली आहे. विशेष म्हणजे बाहेरील गावातील नागरिक येथे दारू पिण्यासाठी येत आहेत. तळीरामांचा गावातील महिलांना त्रास होत आहे. त्यामुळे दारू विक्री बंद करण्यात यावी, अशी मागणीचे निवेदन सरपंच वैशाली माने यांना देण्यात आले. याप्रसंगी उपसरपंच महेश पाटील, ग्रामसेवक ए.आर. जाधव, ग्रामपंचायत सदस्य गोविंद शेळगे, विठ्ठलराव पाटील उपस्थित होते.
निवेदनावर कमलबाई शेळके, लक्ष्मीबाई शेळके, शालू बिरादार, मंगल बिरादार, पार्वती बिरादार, मीनाबाई बिरादार, शिवनंदा बिरादार, छाया मोरे, सरस्वती मोरे, दैवशाला तेलंगे, रेखा तेलंगे, अनिता तेलंगे, मंगल तेलंगे, सविता चिंतगिरे, आशा शेख, सत्यभामा मोरे, रेवती मोरे, पल्लवी मोरे, सुरेखा तेलंगे, जाकिरा तय्यब शेख, शबाना निजाम शेख, अनुसया मोरे, महानंदा घाटे, माया घाटे, अनिता घाटे, शांताबाई दोरवे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.