जिल्ह्यात शिवजयंती उत्साहात साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 04:55 AM2021-02-20T04:55:17+5:302021-02-20T04:55:17+5:30
यशवंत विद्यालय येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. प्राचार्य महादेव गव्हाणे यांनी छत्रपती शिवरायांच्या कार्याविषयी माहिती ...
यशवंत विद्यालय येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. प्राचार्य महादेव गव्हाणे यांनी छत्रपती शिवरायांच्या कार्याविषयी माहिती दिली. यावेळी मुख्याध्यापिका डॉ. सुवर्णा जाधव, शिवाजी जाधव, नरसिंग वाघमोडे, ज्ञानोबा नाईकवाडे, दिलीप कानगुले आदींसह शिक्षक, कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
नवभारत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय खरोसा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी प्राचार्य शेषेराव बिराजदार, पर्यवेक्षक पी.पी. स्वामी, प्रा. दत्तात्रय सुरवसे, प्रा.तानाजी टिके, एम.बी. औरादे, अण्णाराव नरवटे, गोरोबा होगले, सहदेव लोखंडे, संजय सूर्यवंशी, सुयोग सुरवसे आदींची उपस्थिती होती.
समसापूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिवजयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम पार पडला. यावेळी जि.प. शिक्षण समितीचे सदस्य मंगेश सुवर्णकार, शिवनंदा पडलवार, रमाबाई कांबळे आदींसह विद्यार्थी, शिक्षकांची उपस्थिती होती.
महाराष्ट्र आर्यन सेनेच्या वतीने शिवजयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अविराजे निंबाळकर, महादेव दळवे, पंकज मगर, महेश हणमंते, विक्रांत क्षीरसागर, विष्णू पेठकर, अभिजीत कांबळे, मोईज शेख आदींची उपस्थिती होती.
डॉ. विश्वनाथ कराड विश्वशांती गुरुकुल येथे शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी शैलजा कास्टे, वैभव तुंगीकर, प्राचार्य नितीन खिस्ते, सीमा सरोज, नवनीत सिंग, गणेश रेड्डी आदींची उपस्थिती होती.
सुमनदेवी सामाजिक विकास संस्थेच्या वतीने शिवजयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष आशिष भोपणीकर, विश्वरुपी तिकटे, उमा आदमाने, चारुदत्त तिकटे, सच्चिदानंद तिकटे, विश्वसागर काळे, गौतम सूर्यवंशी आदींची उपस्थिती होती.
दयानंद वाणिज्य महाविद्यालयात शिवजयंतीनिमित्त व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी श्या भोळे, उपप्राचार्य डॉ. राजाराम पवार, डॉ. मनीषा अष्टेकर, डॉ. नितीश स्वामी, चंद्रकांत फड, प्रा. विठ्ठल जाधव आदींसह प्राध्यापकांची उपस्थिती होती.
महावितरणच्या लातूर येथील मुख्य कार्यालयात शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी इतिहास अभ्यासक प्रा. विक्रम कदम यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमास मुख्य अभियंता रविंद्र कोलप, अधीक्षक अभियंता दिलीप भोळे, सुरेंद्र कटके, नामदेव पवार, गणेश सामसे, विष्णू ढाकणे, बी.जी. शेंडगे, शंकर माने, कैलास जगताप, जयंत जाधव, राहुल गाडे आदींसह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
ग्रीन लातूर वृक्ष टीमच्या वतीने शिवजयंतीनिमित्त हरित प्रभातफेरी आयोजित करण्यात आली होती. यावेळी ३९१ शोभिवंत फुलझाडे लावण्याच्या उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. याप्रसंगी डॉ. पवन लड्डा, नगरसेवक इम्रान सय्यद, गंगाधर पवार, ॲड. वैशाली यादव-लोंढे, ऋषिकेश दरेकर, मनमोहन डागा, शिवशंकर सुपलकर, सीताराम कणजे, महेश गेल्डा, सुरेखा कारेपूरकर, आशा अयाचित आदींसह ग्रीन लातूर टीमच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
मुक्तांगण इंग्लिश स्कूलमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी सविता लाटे, सुमेरा शेख यांची उपस्थिती होती. शिक्षिका माधुरी वाघमारे यांनी छत्रपती शिवरायांच्या जीवन कार्याविषयी माहिती दिली.
श्री केशवराज विद्यालयात शिवजयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी कृष्णा जोशी, मुख्याध्यापक संजय विभुते, महेश कस्तुरे, संदीप देशमुख, संजय कुलकर्णी, बालासाहेब केंद्रे, इंदू ठाकूर, शैलेश सुपलकर, मनोज कराड, उमेश बुरगे, वनमाला कलुरे, नरेश इरलापल्ले आदींसह शिक्षकांची उपस्थिती होती.