बटनपूर येथे शिवार फेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:24 AM2021-08-13T04:24:21+5:302021-08-13T04:24:21+5:30
हा कार्यक्रम बटनपूर येथील प्रगतशील शेतकरी नामदेवराव पाटील यांच्या लातूर तंत्रज्ञान तूर लागवड क्षेत्रामध्ये घेण्यात आला. यावेळी गटविकास अधिकारी ...
हा कार्यक्रम बटनपूर येथील प्रगतशील शेतकरी नामदेवराव पाटील यांच्या लातूर तंत्रज्ञान तूर लागवड क्षेत्रामध्ये घेण्यात आला. यावेळी गटविकास अधिकारी मनोज राऊत, पंचायत समितीचे उपसभापती शंकर पाटील तळेगावकर, माजी जि.प. सदस्य अशोक पाटील बटनपूरकर, तालुका कृषी अधिकारी शिरीषकुमार घनबहादूर, पंचायत समितीचे कृषी अधिकारी बालाजी केदासे, मंडळ कृषी अधिकारी बी.एस. पाटील, कृषी पर्यवेक्षक बी.एम. जाधव, कृषी सहाय्यक पी.आर. कोंडेकर, राहुल जाधव, सुजाता बनशेळकीकर, माया श्रीनामे, शेतीनिष्ठ पुरस्कार प्राप्त शेतकरी राजकुमार बिरादार, बाबुराव बिरादार, विठ्ठल चिटुपे, ओमकार मस्कले, नामदेवराव पाटील बटनपूरकर, विनायक पाटील बटनपूरकर, कमलाकर पाटील आदी उपस्थित होते.
यावेळी बीडीओ राऊत म्हणाले, शेतीला दुग्ध व्यवसाय हा पूरक असून तालुक्यातील शेतकऱ्यांनी त्यादृष्टीने वाटचाल करावी. तालुका कृषी अधिकारी केदासे यांनी महाडीबीटी, मागेल त्याला शेततळे आदींसंदर्भात मार्गदर्शन केले. तसेच तूर, सोयाबीन, मूग, उडीद, ऊसावर पाने खाणारी अळी, शेंगा पोखरणारी अळी, पिकावर पडलेल्या माव्याचा प्रादुर्भाव करण्यासाठी माहिती दिली.