निलंगा बाजार समिती सभापतीपदी शिवकुमार चिंचनसुरे, उपसभापतीपदी लालासाहेब देशमुख
By हरी मोकाशे | Published: May 25, 2023 06:55 PM2023-05-25T18:55:15+5:302023-05-25T18:55:28+5:30
नुकत्याच झालेल्या निलंगा बाजार समिती निवडणुकीत भाजपने घवघवीत यश संपादन केले आहे.
निलंगा : निलंगा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापतीपदी शिवकुमार चिंचनसुरे तर उपसभापतीपदी लालासाहेब देशमुख यांची गुरुवारी बिनविरोध निवड झाली. गटनेता म्हणून रोहित पाटील यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीनंतर नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
नुकत्याच झालेल्या निलंगा बाजार समिती निवडणुकीत भाजपने घवघवीत यश संपादन केले आहे. त्यामुळे सभापती व उपसभापती पदी कोणाची वर्णी लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. गुरुवारी बाजार समिती कार्यालयात सभापती व उपसभापतीच्या निवडीसाठी पीठासन अधिकारी आर.एल. गडेकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यावेळी सभापती पदासाठी शिवकुमार चिंचनसुरे यांचा तर उपसभापती पदासाठी लालासाहेब देशमुख यांचा प्रत्येकी एक अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले.
यावेळी नूतन सभापती, उपसभापती व संचालकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अरविंद पाटील निलंगेकर म्हणाले, निलंगा बाजार समिती एक आदर्श बाजार समिती निर्माण करावी. शासनाच्या योजना शेतकरी, व्यापाऱ्यांसाठी राबवून विकासाचा वेगळा पायंडा निर्माण करावा.