जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करण्याच्या मागणीसाठी शिवसेनेचे रास्तारोको आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2018 05:23 PM2018-10-15T17:23:04+5:302018-10-15T17:24:09+5:30
लातूर जिल्हा त्वरित दुष्काळग्रस्त जाहीर करावा़ शेतकऱ्यांना हेक्टरी ५९ हजारांची मदत करावी, या प्रमुख मागण्यांसाठी शिवसेनेच्या वतीने निटूर येथे सोमवारी रास्तारोको आंदोलन करण्यात आले़
निटूर (जि. लातूर) : लातूर जिल्हा त्वरित दुष्काळग्रस्त जाहीर करावा़ शेतकऱ्यांना हेक्टरी ५९ हजारांची मदत करावी, या प्रमुख मागण्यांसाठी शिवसेनेच्या वतीने निटूर येथे सोमवारी रास्तारोको आंदोलन करण्यात आले़
शिवसेनेचे जिल्हा सहसंपर्कप्रमुख अभय साळुंके यांच्या नेतृत्वाखाली लातूर- निटूर मार्गावर हे आंदोलन करण्यात आले़ निलंगा तालुक्याची पैसेवारी ५० पैशापेक्षा कमी असताना ती ६१ पैसे दाखविण्यात आली आहे़ ती पैसेवारी कमी करण्यात यावी, अशी मागणी साळुंके यांनी केली़ या आंदोलनात नागनाथ बुडगे, अमर निटूरे, सिध्दू बिरादार, नागनाथ बसवणे, प्रशांत पाटील, शिवाजी सोमवंशी, महेबूब शेख, अमृत कांबळे, गौतम कांबळे, लायक शेख, किशोर मोहिते, प्रसाद बुरकुले, हरिभाऊ सोमवंशी, भगवान करंजे, अंकुश कवडे आदी सहभागी झाले होते़
शासनाची कर्जमाफी फसवी़
अभय साळुंके म्हणाले, पालकमंत्री जिल्ह्याची पाणीपातळी वाढल्याचे सांगत आहेत़ परंतु, प्रत्यक्षात पाणी पातळी घटली आहे़ शासनाची कर्जमाफी ही फसवी असून अनेकांचे कर्ज अजूनही जैसे थे आहे़ शेतकऱ्यांना नवीन कर्जही मिळत नाही़ शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आपले आंदोलन सुरुच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले़