शिवशाही बसला प्रतिसाद मंदावला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:23 AM2021-09-06T04:23:59+5:302021-09-06T04:23:59+5:30

जिल्ह्यातील एकूण आगार - ०५ सुरु असलेल्या शिवशाही बस - ०७ एकूण शिवशाही बस - २६ बसचे दररोज सॅनिटायझेशन... ...

Shivshahi bus response slowed down! | शिवशाही बसला प्रतिसाद मंदावला !

शिवशाही बसला प्रतिसाद मंदावला !

Next

जिल्ह्यातील एकूण आगार - ०५

सुरु असलेल्या शिवशाही बस - ०७

एकूण शिवशाही बस - २६

बसचे दररोज सॅनिटायझेशन...

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने एसटी महामंडळाच्या वतीने साध्या, निमआराम, हिरकणी बसच्या फेऱ्या वाढविण्यात आल्या आहेत. कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता दररोज विविध मार्गावर धावणाऱ्या बसचे सॅनिटायझेशन केले जात आहे. तसेच बसमध्ये मास्क असेल तर प्रवेश दिला जात आहे. कोरोनाच्या प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करुनही बसला प्रवाशांचा अत्यल्प प्रतिसाद आहे. त्यामुळे एसटी महामंडळाला आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.

या मार्गावर सुरु आहेत शिवशाही...

लातूर ते पुणे आणि उदगीर ते पुणे या दोन मार्गावरच शिवशाही बस सुरु आहेत. राज्य परिवहन महामंडळाच्या लातूर विभागात एकूण २६ शिवशाही असून, १९ बस जागेवरच उभ्या आहेत. तर काही बस तांत्रिक कारणामुळे आगारात आहेत.

प्रतिसादानुसार नियोजन...

डिझेलचे दर वाढले आहेत. त्यामुळे शिवशाही बसला प्रवाशांचा प्रतिसाद गरजेचा आहे. सध्या उदगीर ते पुणे शिवशाही बस सुरु आहे. प्रवाशांच्या प्रतिसादानुसार शिवशाही बसच्या फेऱ्या वाढविण्याचे नियोजन सुरु आहे. मात्र, त्यासाठी प्रतिसाद वाढणे गरजेचे आहे. - सचिन क्षीरसागर, विभाग नियंत्रक

Web Title: Shivshahi bus response slowed down!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.