आश्रमशाळेतून बेपत्ता झालेल्या विद्यार्थ्याचा मृतदेह विहिरीत सापडल्याने खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2024 01:23 PM2024-10-05T13:23:53+5:302024-10-05T13:25:00+5:30

रात्री उशिरापर्यंत मुलाच्या नातेवाईकांकडून दोषीवर कारवाई होईपर्यंत विहिरीतून मृतदेह बाहेर काढण्यास विरोध होत होता.

shock after the body of a student who went missing from an ashram school was found in a well | आश्रमशाळेतून बेपत्ता झालेल्या विद्यार्थ्याचा मृतदेह विहिरीत सापडल्याने खळबळ

आश्रमशाळेतून बेपत्ता झालेल्या विद्यार्थ्याचा मृतदेह विहिरीत सापडल्याने खळबळ

पाथरुड (जि.धाराशिव) : भूम तालुक्यातील नळी येथील सूर्यभान तरंगे आश्रम शाळेतून २ ऑक्टोबर रोजी नववीच्या वर्गात शिकणारा आशिष बाळू काळे हा विद्यार्थी बेपत्ता झाल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती. यानंतर आंबी पोलिसांकडून अज्ञाता विरुद्ध गुन्हा दाखल करून चौकशी सुरू होती. यादरम्यान, शुक्रवारी सायंकाळी त्याचा मृतदेह एका विहिरीत आढळल्याने खळबळ उडाली आहे.

नळी येथील शाळेतून बेपत्ता झालेल्या विद्यार्थ्याच्या नातेवाईकांकडून ४ ऑक्टोबर रोजी शाळेत येऊन आमचा मुलगा सापडून द्या, अशी मागणी करण्यात येत होती. यावेळी आंबी येथील पोलीस पथक शाळेमध्ये कसून चौकशी करत होते. परंतु, दोन दिवसापासून बेपत्ता असलेल्या विद्यार्थ्यांचा शोध लागत नव्हता. अखेर शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास नळी वडगाव शिवारातील एका विहिरीत बेपत्ता झालेल्या या विद्यार्थ्यांचा मृतदेह आढळून आला असून, पोलीस पुढील तपास करीत आहेत. मात्र, रात्री उशिरापर्यंत मुलाच्या नातेवाईकांकडून दोषीवर कारवाई होईपर्यंत विहिरीतून मृतदेह बाहेर काढण्यास विरोध होत होता.

Web Title: shock after the body of a student who went missing from an ashram school was found in a well

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.