लांबाेटा येथील शाळा परिसरात शाॅर्टसर्किटने आग
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2024 12:28 AM2024-05-28T00:28:38+5:302024-05-28T00:29:07+5:30
रात्री ९ वाजताची घटना : अग्निशमन दलाने आणली आटाेक्यात...
राजकुमार जाेंधळे / निलंगा (जि. लातूर) : तालुक्यातील लांबाेटा येथील शाळा परिसरात शाॅर्ट सर्किटमुळे आग लागल्याची घटना साेमवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास घडली. या आगीत शाळेतील किचनचे शेड आणि समाेर ठेवलेली लाकडे जळून खाक झाली आहेत.
निलंगा शहरापासून अवघ्या आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या महाराष्ट्र विद्यालय, लांबोटा येथे शॉर्टसर्किटमुळे साेमवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास आग लागली. विद्यालयासमोर टाकण्यात आलेली लाकडे, वाळलेल्या झाडांना आग लागली. यात शाळेचे किचन शेड, लाकडे खाक झाली. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचे प्रत्यक्षदर्शनी सांगितले. निलंगा नगर परिषदेच्या अग्निशमन दलाचा बंब पाचारण करण्यात आला हाेता.
यावेळी माजी नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे, माजी उपनगराध्यक्ष ईश्वर पाटील, सतीश फटे, सौरभ नाईक त्याचबराेबर अग्निशामन दलाचे कर्मचारी नागेश तुरे, सोमनाथ मादळे, विशाल सांडूर आदींनी आग आटाेक्यात आणण्यासाठी पुढाकार घेतला.