श्री गुरुदत्त विद्यालयाची यशाची परंपरा कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:24 AM2021-08-13T04:24:26+5:302021-08-13T04:24:26+5:30
दहावी परीक्षेस विद्यालयातील एकूण ८० विद्यार्थी होते. ३२ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले असून शंभर टक्के निकाल लागला आहे. ...
दहावी परीक्षेस विद्यालयातील एकूण ८० विद्यार्थी होते. ३२ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले असून शंभर टक्के निकाल लागला आहे. त्यात ऋषिकेश मुगावे याने ९५ टक्के गुण घेऊन प्रथम, प्रतिक्षा संभाजी यमुलवाड हिने ९१.८० टक्के गुण घेऊन द्वितीय, सुशांत धुळशेट्टे याने ८९.४० टक्के गुण घेऊन तृतीय आला.
तसेच बारावी विज्ञान परीक्षेस विद्यालयाचे एकूण १६२ विद्यार्थी होते. त्याचा निकाल १०० टक्के लागला. पियुष थोटे याने ९७ टक्के गुण घेऊन प्रथम, शुभम होनराव याने ९२.१६ टक्के गुण घेऊन द्वितीय आला. ऋतुजा रामराव गोंड व प्रांजली शशांक करडखेडकर यांनी प्रत्येकी ९१.८३ टक्के गुण घेऊन तृतीय आल्या आहेत. १६० विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले.
कला शाखेचा निकाल शंभर टक्के लागला असून ६० विद्यार्थी परीक्षेस होते. व्यवसाय अभ्यासक्रमाचाही शंभर टक्के निकाल लागला असून ५७ विद्यार्थी परीक्षेस होते. कला शाखेतील अश्विनी विजय शिंगाडे हिने ८५ टक्के घेऊन प्रथम, वैशाली दत्तात्रय ढगे हिने ८४.५० टक्के गुण घेऊन द्वितीय तर सुनिता शिवाजी श्रीमंगले हिने ८४ टक्के गुण घेऊन तृतीय आली. व्यवसाय अभ्यासक्रम शाखेत अजय पवार याने ८५ टक्के घेत प्रथम, आरती बळवंत जोगदंड हिने ८३ टक्के घेत द्वितीय तर सिद्धेश्वर पवार याने ८२ टक्के घेत तृतीय आला. गुणवंतांचे कौतुक प्राचार्य डी.डी. हम्पल्ले, संस्था सचिव चंद्रशेखर पाटील, अध्यक्ष डॉ. अशोकर सांगवीकर आदींनी केले.