कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे आजारी पशुधन अडचणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:14 AM2021-07-22T04:14:16+5:302021-07-22T04:14:16+5:30
संपावर असलेल्या कर्मचाऱ्यांना पशुधन विकास अधिकारी हा दर्जा हवा आहे. त्यांना पदवीधर डॉक्टरच्या मार्गदर्शनाखाली किंवा त्यांच्या सल्ल्याने २२ प्रकारच्या ...
संपावर असलेल्या कर्मचाऱ्यांना पशुधन विकास अधिकारी हा दर्जा हवा आहे. त्यांना पदवीधर डॉक्टरच्या मार्गदर्शनाखाली किंवा त्यांच्या सल्ल्याने २२ प्रकारच्या सेवा पशूंना देणे बंधनकारक आहे. मात्र, त्यांना ही सेवा स्वतंत्रपणे देण्याची मुभा मिळावी या प्रमुख मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी आंदोलन छेडले आहे. सदरील कर्मचारी दररोज कार्यालयात येतात. काही वेळ बसतात व निघून जातात. पशुपालकांचा फोन आला असता आम्ही संपावर आहोत असे सांगतात. त्यामुळे निलंगा तालुक्यातील पशुधन आजारी पडले तर जायचे कुठे, हा प्रश्न पशुपालकांसमोर असून हा संप मिटून आजारी पशूंना सेवा मिळावी अशी मागणी तालुक्यातील पशुपालकांनी केली आहे. दरम्यान, या मागणीचे निवेदन पालकमंत्री अमित देशमुख, जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे यांना देण्यात आले आहे.
पशुधनाची सेवा करणे बंधनकारक...
शासन निर्देशानुसार पशुधन पर्यवेक्षक यांना पशुधन विकास अधिकारी यांच्या हाताखाली किंवा त्यांच्या सल्ल्याने २२ प्रकारच्या सेवा पशूंना देणे बंधनकारक आहे. असे असतानाही हे आंदोलन चालू आहे. गुरुवारपर्यंत सर्व कार्यालयांचा अहवाल येईल. त्यामध्ये कोणी कामात कुचराई केली असेल त्यांचा पगार काढण्यात येणार नाही व त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल. -डॉ. आर. डी. पडिले, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी