स्वयंसिद्धा महिला मंडळाचा रौप्यमहोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 04:45 AM2020-12-11T04:45:55+5:302020-12-11T04:45:55+5:30

गतिरोधक बसविण्याची नागरिकांची मागणी लातूर : पाच नंबर चौक ते औसा रिंग रोडवर अवजड वाहनांची वर्दळ असते. नवीन रस्ता ...

Silver Jubilee of Swayamsiddha Mahila Mandal | स्वयंसिद्धा महिला मंडळाचा रौप्यमहोत्सव

स्वयंसिद्धा महिला मंडळाचा रौप्यमहोत्सव

Next

गतिरोधक बसविण्याची नागरिकांची मागणी

लातूर : पाच नंबर चौक ते औसा रिंग रोडवर अवजड वाहनांची वर्दळ असते. नवीन रस्ता झाला असल्याने अनेक वाहने वेगाने धावतात. त्यामुळे अपघाताचा धोका वाढला असून, या नवीन रस्त्यावर गतिरोधक बसविण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे. सायंकाळच्या वेळी या रस्त्याच्या कडेला वाहने पार्किंग केली जातात. याकडे शहर वाहतूक शाखेने लक्ष देण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.

माथाडी कामगार संघटनेच्या वतीने बंद

लातूर : माथाडी कामगारांच्या विविध मागण्यांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी माथाडी कामगार संघटनेच्या वतीने १४ डिसेंबर रोजी राज्यव्यापी बंद पुकारण्यात आला आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे अध्यक्ष शिवाजी कांबळे, जिल्हा उपाध्यक्ष बालाजी जाधव यांनी दिली. कोरोना संकटामुळे अनेक माथाडी कामगारांच्या हातचा रोजगार हिरावला आहे.

वृक्षांचे संगोपन

लातूर : जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात मियावाॅकी पद्धतीने लागवड करण्यात आलेल्या वृक्षांची काळजी घेतली असून, नियमित पाणी पुरवठा केला जात आहे. त्यासाठी स्वतंत्र कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून, जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात असलेल्या मैदानाचे सुशोभिकरणही करण्यात आले आहे.

भाजीपाल्यांची आवक

लातूर : शहरातील भाजीपाला बाजारात भाजीपाल्यांची आवक वाढली आहे. त्यामुळे दरात घसरण झाली असून, शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. जिल्ह्यात यंदा समाधानकारक पाऊस असल्याने भाजीपाला लागवडीला शेतकऱ्यांची अधिक पसंती असल्याचे चित्र आहे.

महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन

लातूर : उदगीर तालुक्यातील वाढवणा (बु.) येथे भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी सुधीर तिकटे, मनोज गायकवाड, विलास गायकवाड, जावेद शेख, अमोल गायकवाड, आनंद भांगे, सूरज आळंदी, अविनाश वाघमारे, विलास गायकवाड यांची उपस्थिती होती. यावेळी मनोज गायकवाड यांनी भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्याविषयी माहिती दिली.

Web Title: Silver Jubilee of Swayamsiddha Mahila Mandal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.