नवी मुंबईचा माजी महापाैर आहे म्हणून एकाला सहा लाखांना गंडा

By राजकुमार जोंधळे | Published: October 4, 2023 07:15 PM2023-10-04T19:15:18+5:302023-10-04T19:15:23+5:30

लातुरातील एमआयडीसी ठाण्यात गुन्हा...

six lakhs fraud by saying former mayor of Navi Mumbai | नवी मुंबईचा माजी महापाैर आहे म्हणून एकाला सहा लाखांना गंडा

नवी मुंबईचा माजी महापाैर आहे म्हणून एकाला सहा लाखांना गंडा

googlenewsNext

लातूर : मी, माजी खासदार गणेश नाईक यांच्या पुतण्या असून, नवी मुंबईचा महापाैर आहे, अशी बतावणी करून लातुरातील एका गुत्तेदाराला सहा लाखांना गंडा घातल्याची घटना घडली. याबाबत एमआयडीसी पाेलिस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल केला आहे.

एमआयडीसी पाेलिस ठाण्याचे पाेलिस निरीक्षक गाेरख दिवे यांनी सांगितले, फिर्यादी अविनाश सर्जेराव माेरे (रा. लातूर) यांच्याशी सचिनसिंग मदनसिंग परदेशी (रा. मुंबई) असे नाव असलेल्या व्यक्तीने संपर्क साधला. अविनाश माेरे यांना लातूर येथे जिओ कंपनीचे सब काॅन्ट्रॅक्ट देताे, मी माजी खासदार गणेश नाईक यांचा पुतण्या आहे. नवी मुंबईचा माजी महापाैर आहे. असे सांगून पहिल्यांदा विश्वास संपादन केला. 

या बाेलण्यावर विश्वास ठेवत फिर्यादी अविनाश सर्जेराव माेरे यांनी लातुरातील एमआयडीसी एक नंबर चाैक, बॅंक ऑफ महाराष्ट्र, मुख्य शाखेतून ३० सप्टेंबर २०२३ राेजी दुपारच्या सुमारास संबंधित व्यक्तीला ‘आरटीजीएस’च्या माध्यमातून सहा लाख रुपये पाठविले. त्यानंतर संबंधित भामट्याने जिओचे सब काॅन्ट्रॅक्टही दिले नाही. शिवाय, पैसेही परत दिले नाहीत. यातून आपली फसवणूक झाली आहे, असे तक्रारदार माेरे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी एमआयडीसी पाेलिस ठाण्यात तातडीने धाव घेतली. याबाबत एमआयडीसी पाेलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून सहा लाखांच्या फसवणूक प्रकरणी सचिनसिंग मदनसिंग परदेशी (रा. मुंबई) याच्याविराेधात गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: six lakhs fraud by saying former mayor of Navi Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.