लातूरसाठी कौशल्य विद्यापीठाचा प्रस्ताव
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2019 06:49 PM2019-09-22T18:49:15+5:302019-09-22T18:49:50+5:30
महाराष्ट्रात सहा कौशल्य विद्यापीठे स्थापन करण्याचा निर्णय प्रस्तावित आहे. त्यातील वैद्यकीय क्षेत्राला पूरक ठरणारे एक कौशल्य विद्यापीठ लातूरमध्ये होईल, अशी ग्वाही पालकमंत्री तथा कौशल्य विकास व अन्न नागरी पुरवठा मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिली.
महाराष्ट्रात सहा कौशल्य विद्यापीठे स्थापन करण्याचा निर्णय प्रस्तावित आहे. त्यातील वैद्यकीय क्षेत्राला पूरक ठरणारे एक कौशल्य विद्यापीठ लातूरमध्ये होईल, अशी ग्वाही पालकमंत्री तथा कौशल्य विकास व अन्न नागरी पुरवठा मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिली.
- पाणीप्रश्न गंभीर आहे, वॉटर ग्रीड, उजनीवर आपण शब्द दिला. परंतु, परतीचा पाऊस नाही झाल्यास जनतेला दिलासा कसा देणार?
- वॉटर ग्रीडचा महत्वकांक्षी प्रश्न होणार आहे. त्यात लातूर, उस्मानाबादचा समावेश करण्याची भूमिका आपण मांडली़ उजनीचे पाणी दोन वर्षात नाही मिळाले तर आपली भविष्यातील पदांच्या राजीनाम्याची तयारी आहे़
यापूर्वी अनेकांनी घोषणा केल्या मात्र कालावधी सांगितला नाही. मी कालावधी सांगत आहे. त्यानंतर काय करणार हे, ही स्पष्ट करत आहे़ तसेच पुढच्या महिन्यात पाणी पुरवठ्यासाठी टँकर आणि इतर उपाययोजनांबाबत प्रशासनाने तयारी पूर्ण केली आहे.
- रेल्वे बोगी कारखान्यात भरती केंद्रीय पद्धतीने होईल, मग स्थानिकांना रोजगार कसा मिळेल?
- रेल्वे बोगीच्या कारखान्यासाठी जागा राज्यशासनाने दिली आहे. त्यामुळे इथे ७५ टक्के स्थानिकांना संधी द्या, याचा आग्रह आपण सरकारकडे धरू. याबाबत संबंधित मंत्र्यांशी बोलणेही झाले.
- वैद्यकीय प्रवेशातील ७०:३० मुळे मराठवाड्यावर अन्याय होतो. सरकार मात्र भूमिका नीटपणे मांडत नाही?
- हा लातूरसह मराठवाड्याचा प्रश्न आहे. मी स्वत: मुख्यमंत्र्यांना बोललो आहे़ गुणवत्तेवर अन्याय करता येणार नाही. शासन योग्य भूमिका मांडेल. आपण हा प्रश्न न्याय मिळेपर्यंत लावून धरू.
- शैक्षणिक हब असलेल्या लातूरसाठी पाच वर्षात नवे काही मिळालेले नाही?
- असं म्हणता येणार नाही. मुंबईनंतरचे पहिले विभागीय विज्ञान केंद्र लातूरसाठी मंजूर झाले आहे. त्यासाठी १२५ कोटींचा निधी आहे. हे विज्ञान केंद्र पाहण्यासाठी मराठवाड्यातून विद्यार्थी येतील. त्यासाठीची जागाही उपलब्ध करून घेतली आहे़ लातूरची राजकीय संस्कृती जपू़.