अवैध दारूची चोरटी विक्री; १ लाख ५७ हजारांचा मुद्देमाल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:21 AM2021-02-24T04:21:28+5:302021-02-24T04:21:28+5:30
मुरुड हद्दीतील तांदुळजा येथे विनापरवाना बेकायदेशीररित्या देशी व विदेशी दारूची विक्री होत असल्याची गुप्त माहिती विशेष पोलीस पथकाला मिळाली. ...
मुरुड हद्दीतील तांदुळजा येथे विनापरवाना बेकायदेशीररित्या देशी व विदेशी दारूची विक्री होत असल्याची गुप्त माहिती विशेष पोलीस पथकाला मिळाली. त्यानुसार २२ फेब्रुवारी रोजी ५ वाजता छापा मारला असता ईश्वर बाळासाहेब भिसे (४५, रा. तांदुळजा) हे स्वत:च्या फायद्यासाठी देशी व विदेशी दारूची चोरटी विक्री करीत असल्याचे निदर्शनास आले. यावेळी त्याच्या ताब्यातून मॅकडॉल नं. १, इनपेरियल ब्ल्यू, टुबर्ग, बडवायजर, टँगो अशा वेगवेगळ्या कंपन्यांच्या १८० मि.ली. देशी व विदेशी दारूच्या बाटल्या मिळाल्या. त्याची किंमत १ लाख ४०० रुपये आहे. दरम्यान, मुरुड हद्दीतच तांदुळजा येथे ४.३० वाजण्याच्या सुमारास रामचंद्र जीवनराव गायकवाड (५०, रा. तांदुळजा) यांच्या ताब्यातही देशी व विदेशी दारूच्या बाटल्या आढळून आल्या. २४ हजार ५२७ रुपयांचा ऐवज या कारवाईत जप्त करण्यात आला. या दोन्हीही छाप्यात एकूण १ लाख ५७ हजार ९२७ रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला. याबाबत मुरुड पोलिसात कलम ६५ ई महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास मुरुड पोलीस करीत आहेत.