कर्नाटकातून झाेपेच्या गोळ्यांची लातुरात तस्करी; ३५० गोळ्यांसह युवकाला पकडले

By राजकुमार जोंधळे | Published: August 29, 2022 05:25 PM2022-08-29T17:25:20+5:302022-08-29T17:26:33+5:30

लातूर शहरात सध्याला झाेपेच्या गाेळ्या काही मेडिकलवर, टपरीवरुन विक्री हाेत असल्याची माहिती खबऱ्यामार्फत पाेलिसांना मिळाली.

Smuggling of sleeping pills from Karnataka in Latur ; Youth caught with 350 bullets | कर्नाटकातून झाेपेच्या गोळ्यांची लातुरात तस्करी; ३५० गोळ्यांसह युवकाला पकडले

कर्नाटकातून झाेपेच्या गोळ्यांची लातुरात तस्करी; ३५० गोळ्यांसह युवकाला पकडले

Next

लातूर : झाेपेच्या ३५० गाेळ्यासह एका युवकाला लातूर पाेलिसांनी पकडले असून, त्यांच्या विराेधात शिवाजीनगर पाेलीस ठाण्यात साेमवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाेलिसांनी सांगितले, लातूर शहरात सध्याला झाेपेच्या गाेळ्या काही मेडिकलवर, टपरीवरुन विक्री हाेत असल्याची माहिती खबऱ्यामार्फत पाेलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे शिवाजीनगर पाेलीस ठाण्याचे सहायक पाेलीस निरीक्षक प्रविण राठाेड यांनी सुतमील राेड परिसरात एका युवकाला पकडण्यात आले. ताे झाेपेच्या गाेळ्या विक्री करत असल्याचे आढळून आले. दरम्यान, सापळा रचून पाेलीस आणि अन्न औषध प्रशासन कार्यालयाच्या पथकाने संयुक्तपणे त्यास ताब्यात घेत पंचनामा केला.

घटनास्थळी मारलेल्या छाप्यात चाकूर तालुक्यातील दापक्याळ येथील सुमित संताेष कासले (वय २२) या युवकाला पकडले असून, १० एमजीच्या ३५० गाेळ्यांचे दाेन बाॅक्स जप्त केले आहेत. याबाबत शिवाजीनगर पाेलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन सुमित कासले याच्याविराेधात गुरनं. ३७४ / २०२२ कलम २७६, ३२८, ३३६ भादंविसह कलम ८ (क), २१, २२ (२२), २९ अमली औषधी द्रव्य व मनप्रीावी पदार्थ अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पाेलीस निरीक्षक पाटील करत आहेत.

रॅकेचा पाेलिसांकडून शाेध...
लातुरात चाेरट्या मार्गाने विविध मेडिकल, पानटपरीवर झाेपेच्या गाेळ्या विक्रीसाठी पुरवठा करणाऱ्या रॅकेटचा शाेध लातूर पाेलीस घेत आहेत. रॅकेट हाती लागल्यानंतर गुन्ह्यांची व्याप्ती आणि त्यांच्या कारनाम्याची माहिती समाेर येणार आहे.

पाेलिसांनी दुसऱ्यांदा मारला छापा...
औरंगाबादपाठाेपाठ लातूर पाेलिसांनी झाेपेच्या, गुंगीच्या गाेळ्या विक्री करणाऱ्या मेडिकल, पानटपरीवर यापूर्वी एकदा छापा मारला हाेता. दरम्यान, या कारवाईत त्यांनी माेठ्या प्रमाणावर गाेळ्यांचा साठाही जप्त केला आहे. आता सुतमीलराेड परिसरात केलेली ही कारवाई दुसऱ्यांदा आहे. अशा गाेळ्यांच्या विक्रीवर पाेलिसांची करडी नजर आहे.

कर्नाटकातील गाेळ्या लातुरात...
शेजारच्या कर्नाटक राज्यातून चाेरट्या मार्गाने झाेपेच्या, गुंगीच्या गाेळ्यांचा पुरवाठा करणारे रॅकेट सक्रिय असल्याच्या वृत्ताला पाेलिसांनीही दुजाेरा दिला आहे. लातूरलगत असलेल्या सीमाभागातून या गाेळ्या लातुरात येत असल्याची माहिती पाेलिसांकडे आहे. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. 
- निखिल पिंगळे, पाेलीस अधीक्षक

Web Title: Smuggling of sleeping pills from Karnataka in Latur ; Youth caught with 350 bullets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.