महामार्गावर गोगलगायी सोडून हलगरा पाटी, निटूर येथे रास्तारोको, गोगलगाय प्रादुर्भावाच्या अनुदानातून वगळल्याने संताप
By हरी मोकाशे | Published: September 18, 2022 01:48 PM2022-09-18T13:48:14+5:302022-09-18T13:49:11+5:30
Latur News: गोगलगायींच्या प्रादुर्भावामुळे निलंगा तालुक्यातील सोयाबीन अतोनात नुकसान झाले. त्याचे पंचनामे करण्यात आले. मात्र, अनुदानातून तालुक्यातील सहा कृषी मंडळे वगळल्याने संताप व्यक्त करीत रविवारी सकाळी ११ वा. लातूर- जहिराबाद महामार्गावरील हलगरा पाटी आणि निटूर या दोन ठिकाणी रास्तारोको आंदोलन करण्यात आले.
- हरी मोकाशे
लातूर - गोगलगायींच्या प्रादुर्भावामुळे निलंगा तालुक्यातील सोयाबीन अतोनात नुकसान झाले. त्याचे पंचनामे करण्यात आले. मात्र, अनुदानातून तालुक्यातील सहा कृषी मंडळे वगळल्याने संताप व्यक्त करीत रविवारी सकाळी ११ वा. लातूर- जहिराबाद महामार्गावरील हलगरा पाटी आणि निटूर या दोन ठिकाणी रास्तारोको आंदोलन करण्यात आले. विशेष म्हणजे, हलगरा पाटी येथे शेतकऱ्यांनी महामार्गावर गोगलगायी सोडून आंदोलन केले.
काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर आणि प्रदेश सचिव अभय साळुंके यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नुकसानीची पाहणी करुन पंचनामे केले असतानाही औराद शहाजानी, हलगऱ्यासह सहा कृषी मंडळांना वगळण्यात आले आहे. पक्षपात करुन अनुदान दिले जात आहे, असा आरोपही करण्यात आला. या आंदोलनात वैजनाथ वलांडे, गाेरख नवाडे, सयाजी पाटील, दत्तात्रय पाटील, राम अंचुळे, दत्ता सगरे, आत्माराम पाटील, रमेश मदरसे, संतोष गंगथडे, मदन बिरादार, संजय थेटे यांच्यासह शेतकरी सहभागी झाले आहेत.
दरम्यान, निटूर येथेही काँग्रेस आणि शेतकऱ्यांच्या वतीने रास्तारोको आंदोलन करण्यात आले. यावेळी माजी जि.प. सदस्य सुरेंद्र धुमाळ, सोसायटीचे चेअरमन दिनकर निटुरे, गंगाधर चव्हाण, बसपूरचे उपसरपंच राम पाटील, रमेश लांबोटे, छावा संघटनेचे तालुकाध्यक्ष तुळशीदास साळुंके, राजकुमार सोनी, बळी मधाळे, खंडू बुरकुले, विलास सावळे, नंदकुमार हासबे, जब्बार चाऊस, किरण मगर, ज्ञानोबा पाटील, लाला पटेल, बाबुराव भदर्गे, हसन मोमीन, बासीद गस्ते, सूर्यकांत निटुरे, साबेर चाऊस, ज्ञानेश्वर पिंड, ओमकार सोलंकर, बुजरूकवाडीचे सरपंच साहेबराव भोयबार, उपसरपंच ज्ञानोबा पौळकर, शिवाजी जाधव यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.