एकाचवेळी दोन दुकानांत साप, व्यापाऱ्यांसह ग्राहकांत गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:19 AM2021-08-01T04:19:38+5:302021-08-01T04:19:38+5:30
शहरातील बसस्थानकासमोर व्यापारी संकुल आहे. शनिवारी सकाळी १०.३० वा. च्या सुमारास गजानन कृषी सेवा केंद्राचे गजानन बोरूळे यांनी ...
शहरातील बसस्थानकासमोर व्यापारी संकुल आहे. शनिवारी सकाळी १०.३० वा. च्या सुमारास गजानन कृषी सेवा केंद्राचे गजानन बोरूळे यांनी ग्राहकांना फवारणीचे औषध देण्यासाठी बॉक्स उघडला. तेव्हा औषधाच्या बॉक्समध्ये घोणस जातीचा विषारी साप आढळून आला. हे पाहताच त्यांची एकच धावपळ उडाली. पाहता पाहता नागरिकांची गर्दी झाली. बोरुळे यांनी सर्पमित्र प्रमोद पुरी यांना बोलावून घेतले. सर्पमित्राने शिताफीने सापाला पकडून प्लास्टिकच्या बरणीत कैद केले. त्यामुळे सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला.
दरम्यान, याच संकुलामध्ये काही अंतरावर असलेल्या सुनील अग्रवाल यांच्या अमेय किराणा स्टोअर्समध्ये धामण जातीचा साप दिसला. त्यांनी सर्पमित्र संगप्पा मंठाळे यांना बोलावून घेतले. त्यांनी हा साप पकडून बरणीत कैद केला. एकाच कॉम्प्लेक्समध्ये एकाच वेळी दोन ठिकाणी साप निघाल्यामुळे बघ्यांची गर्दी जमली होती.