प्रशिक्षण पूर्ण केलेल्या जवानांनी सीमा सुरक्षा बलाची उंची वाढवावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:03 AM2021-01-08T05:03:10+5:302021-01-08T05:03:10+5:30

येथील सीमा सुरक्षा बलाच्या सहाय्यक प्रशिक्षण केंद्रात आयोजित दीक्षांत परेड समारंभात ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी बी.पी. पृथ्वीराज, पोलीस ...

Soldiers who have completed the training should increase the height of the Border Security Force | प्रशिक्षण पूर्ण केलेल्या जवानांनी सीमा सुरक्षा बलाची उंची वाढवावी

प्रशिक्षण पूर्ण केलेल्या जवानांनी सीमा सुरक्षा बलाची उंची वाढवावी

Next

येथील सीमा सुरक्षा बलाच्या सहाय्यक प्रशिक्षण केंद्रात आयोजित दीक्षांत परेड समारंभात ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी बी.पी. पृथ्वीराज, पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, कमाण्डेन्ट संदीप रावत, कपिल चौहान, एस.एस.निकम, सहाय्यक कमांडट, विनोद तांदळे,उत्तम कांबळे,राहूल खजोरिया,चेतन पाखले,सुनील कापसे,रत्नेश्वर भिसे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मलिक म्हणाले, येथील १३७ जवांनानी खडतर प्रशिक्षण पूर्ण केले.त्यात देशातील विविध भागातील सीमा सुरक्षा बलात शहीद जवानांच्या १२७ मुलांचा समावेश आहे. देशातील बहूतेक पहिलीच वेळ असेल की शहीद जवानांच्या कुटूंबातील इतक्या मोठ्या संख्येने तरुण मुले पुन्हा देशाच्या रक्षणासाठी सीमा सुरक्षा दलात दाखल होत शहीदांचा वारसा पुढे नेत आहेत. प्रारंभी नव आरक्षकांनी राष्ट्रध्वजास मानवंदना देऊन परेडचे संचलन केले. प्रास्ताविक संदीप रावत यांनी केले. सुनिल कापसे यांनी आभार मानले.४४ आठवड्यांचे खडतर प्रशिक्षण...

प्रशिक्षणात शस्त्र चालविणे,गोळाबारुद,फिल्ड इंजिनियरींग असे विविध प्रशिक्षण देण्यात आले. या परेडचे संचलन आश्विन कुमार यांनी केले.यावेळी सर्वोत्तम जवानांना मेडल देऊन सन्मानित करण्यात आले. या प्रशिक्षण केंद्रातून प्रशिक्षण पूर्ण केलेले १३७ जवान हे देशाच्या सीमेवर सुरक्षतेसाठी आता पाकिस्तानव बांगलादेशच्या सीमेवर कर्तव्य बजावणार आहेत.

Web Title: Soldiers who have completed the training should increase the height of the Border Security Force

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.