काहींना आनंद अन् काहींचा झाला हिरमोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 06:22 AM2021-02-05T06:22:22+5:302021-02-05T06:22:22+5:30

उपविभागीय अधिकारी सदाशिव पडदुने यांच्या अध्यक्षतेखाली चिठ्ठीद्वारे आरक्षण काढण्यात आले. यामध्ये खुल्या प्रवर्गासाठी १९, नामाप्रसाठी ११, अनुसूचित जातीसाठी १० ...

Some were happy and some were hilarious | काहींना आनंद अन् काहींचा झाला हिरमोड

काहींना आनंद अन् काहींचा झाला हिरमोड

Next

उपविभागीय अधिकारी सदाशिव पडदुने यांच्या अध्यक्षतेखाली चिठ्ठीद्वारे आरक्षण काढण्यात आले. यामध्ये खुल्या प्रवर्गासाठी १९, नामाप्रसाठी ११, अनुसूचित जातीसाठी १० तर २ ग्रामपंचायती अनुसूचित जमातीसाठी आरक्षित झाल्या आहेत. यावेळी तहसीलदार अतुल जटाळे, निवडणूक विभागप्रमुख शिंदे, माधव कारलेकर आदी उपस्थित होते.

अनुसूचित जाती प्रवर्ग पुरुष : साकोळ, दैठणा, अजणी (बु.), होनमाळ, वांजरखेडा.

अनुसूचित जाती प्रवर्ग महिला : हालकी, कांबळगा, धामणगाव, तळेगाव (दे.), येरोळ.

खुल्या पुरुष प्रवर्गासाठी आनंदवाडी, कारेवाडी, चांभरगा, तुरूकवाडी, बिबराळ, शिवपूर, हिप्पळगाव, सुमठाणा, तळेगाव (बो.), खुल्या प्रवर्गातील महिला अंकुलगा (राणी), उमरदरा, जोगाळा, बेवनाळ, बोळेगाव (बु.), शेंद, सांगवी घुग्गी, थेरगाव, उजेड, हणमंतवाडी.

रापका, बाकली आरक्षित...

नागरिकांचा मागास प्रवर्ग पुरुष : अंकुलगा (स.), कळमगाव, कानेगाव, डोंगरगाव (बो.), नागेवाडी तर नागरिकांचा मागास प्रवर्गातील महिलांसाठी आरी, गणेशवाडी, तिपराळ, भिंगोली, रापका, बाकली येथील सरपंचपद आरक्षित झाले आहे. अनुसूचित जमाती पुरुष : लक्कडजवळगा, अनुसूचित जमाती महिलेसाठी डिगोळ येथील सरपंचपद राखीव झाले आहे.

Web Title: Some were happy and some were hilarious

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.