आईचा छळ करणाऱ्या बापाचा मुलाने केला खून; २० हजारांसाठी मदत करणारा मित्रही ताब्यात
By राजकुमार जोंधळे | Published: August 2, 2022 05:42 PM2022-08-02T17:42:33+5:302022-08-02T17:43:28+5:30
राेजच्या भांडणाला, मारझाेडीला कंटाळलेल्या मुलाने दाेन महिन्यापूर्वी बापाचा काटा काढण्याचा कट कचला.
लातूर : आईचा सतत छळ करुन मारझाेड करणाऱ्या जन्मदात्याचा खून मुलाने मित्राच्या मदतीने केल्याची घटना लातूर तालुक्यातील चिंचाेली (बल्लाळनाथ) येथे घडली हाेती. दरम्यान, अधिक चाैकशीनंतर या खुनाच्या घटनेचे तिसऱ्या दिवशी बिंग फुटले आहे. याबाबत गातेगाव पाेलिसांनी दाेघांना ताब्यात घेतले आहे.
पाेलिसांनी सांगितले, चिंचाेळी (ब.) येथील नागनाथ खंडू काळे (वय ४९) हा सतत दारु पिवून पत्नी आणि मुलाला मारझाेड करत छळत हाेता. या त्रासाला कंटाळून पत्नी काही दिवस माहेरी गेली हाेती. राेजच्या भांडणाला, मारझाेडीला कंटाळलेल्या मुलाने दाेन महिन्यापूर्वी नागनाथ काळे याचा काटा काढण्याचा कट कचला. त्याने याबाबत याेजना आखली. या याेजनेत आपल्या मित्राला २० हजार रुपये देताे म्हणून सहभागी करुन घेतले. दरम्यान, आई आजाेळी गेली असून, घरात काेणीच नाही, याचा फायदा घेण्याचे ठरवले. नागनाथ काळे हा दारु पिवून घरात ३० जुलैराेजी झाेली गेला हाेता.
यावेळी मुलगा आकाश नागनाथ काळे (१९) याने मित्र राेहित रघुनाथ पाेपळे (३१) याला साेबत घेत वडिल नागनाथ काळे यांना गळ्यावर लाेखंडी काेयत्याने वार करुन ठार मारले. शिवाय, गुन्ह्यात वापरलेले हत्यार पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने लपवून ठेवले. याबाबत प्रारंभी आकस्मात मृत्यूची नाेंद केली हाेती. घटनास्थळी भेट दिल्यानंतर हा प्रकार संशयास्पद वाटला. त्यादिशेने पाेलिसांनी आपल्या तपासाची चक्रे गितिमान केली. शेवटी मयताच्या मुलाला पाेलिसांनी ताब्यात घेत पाेलिसी खाक्या दाखविला. यावेळी त्याने सततचे भांडण, त्रासाला कंटाळून हा खून आपण केल्याची कबुली दिली. याबाबत पाेलीस उपनिरीक्षक नंदकिशाेर कांबळे यांच्या तक्रारीवरुन गुरनं. ८८ / २०२२ कलम ३०२, २०१, ३४ भदंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मित्राला २० हजार द्यायचे ठरले...
आकाश याने आपल्या बापाचा खून करण्यासाठी मित्र राेहित पाेपळे यांने मदत करावी, यासाठी २० हजार रुपये देण्याचे कबूल केले हाेते. त्यानंतर ठरल्याप्रमाणे बापाचा खून करण्यात आला. तिन दिवसानंतर या घटनेचे बिंग फुटल्याने दाेघेही पाेलिसांच्या जाळ्यात अडकले, असेही सहायक पाेलीस निरीक्षक घारगे म्हणाले.