स्त्री रुग्णालयात सोनोग्राफी मशीन

By Admin | Published: January 8, 2015 12:54 AM2015-01-08T00:54:55+5:302015-01-08T00:58:26+5:30

लातूर : शहरातील लेबर कॉलनी येथील स्त्री रुग्णालय व नवजात अर्भक केंद्रात सोनोग्राफी मशीन नसल्याने गरोदर मातांची सोनोग्राफी तपासणी केली जात नव्हती.

Sonography Machine at Women Hospital | स्त्री रुग्णालयात सोनोग्राफी मशीन

स्त्री रुग्णालयात सोनोग्राफी मशीन

googlenewsNext


लातूर : शहरातील लेबर कॉलनी येथील स्त्री रुग्णालय व नवजात अर्भक केंद्रात सोनोग्राफी मशीन नसल्याने गरोदर मातांची सोनोग्राफी तपासणी केली जात नव्हती. ‘लोकमत’ने हा विषय ऐरणीवर घेऊन वृत्तमालिका प्रसिद्ध केली. या वृत्ताची दखल घेत जिल्हा शल्य चिकित्सकांनी सोनोग्राफी यंत्र या रुग्णालयाला दिले आहे. सोमवारपासून गरोदर मातांची तपासणीही या यंत्राद्वारे सुरू झाली आहे.
लेबर कॉलनी येथील जिल्हा स्त्री रुग्णालय व नवजात अर्भक केंद्र नव्याने सन २०११-१२ रोजी सुरू करण्यात आले़ जिल्हा स्त्री रुग्णालय असल्याने या रुग्णालयात सर्व आत्याधुनिक सोयी सुविधा देण्याचा प्रशासनाच्या वतीने प्रयत्न केला जात होता़ तरी चार वर्ष होऊनही रुग्णालयात आवश्यक असणारी सोनोग्राफी मशीनची सुविधा मात्र गरोदर मातांना मिळत नव्हती़ शिशु सुरक्षा योजना, जननी सुरक्षा योजनेच्या उपक्रमामुळे ग्रामीण तसेच शहर महिला प्रसुतीसाठी रुग्णालयात येत आहेत़ त्यांच्या सर्व तपासण्या मोफत केल्या जाता़त़ पण केवळ सोनोग्राफी मशीन नसल्याने सोनोग्राफी तपासणीसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात किंवा खाजगी सोनोग्राफी केंद्राचा आधार घ्यावा लागत होता़ त्यामुळे गरीब कुटुंबातील गरोदर मातांची आर्थिक, मानसिक, तसेच शारीरिक त्रास सहन करावा लागत होता़ हा विषय मागील सहा महिन्यापासून ‘लोकमत’ ने ऐरणीवर लावून धरला असता प्रशासनाने प्रायव्हेट पब्लिक पार्टनरशिप अंतर्गत व्हिपरो कंपनीस सोनोग्राफी व अन्या विभाग चालवण्यासाठी दिले गेले होते़ तरी सोनोग्राफी मशीनमुळे गरोदर मातांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी विशेष बाब म्हणून नवीन सोनोग्राफी मशिन उपलब्ध करुन देण्यात आले़ या रुग्णालयाच्या अधिक्षक डॉ़ एस़ आऱ वीर यांनी रितसर शासनाकडे या सोनोग्राफी विभागाची नोंदणी करुन घेतली़ तसेच जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बस्वराज कोरे यांनी ही प्रक्रिया तात्काळ मान्यता देवून हा विभाग सुरुकण्यासाठी विशेष लक्ष दिले़ त्यामुळे केवळ सहा महिन्यात स्त्री रुग्णालयात एक अद्ययावत सोनोग्राफी विभाग सुरू करण्यात आला आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: Sonography Machine at Women Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.