सोयाबीनची आवक घटली; ७३१० रुपयांचा उच्चांकी दर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:19 AM2021-04-27T04:19:57+5:302021-04-27T04:19:57+5:30
सोमवारी बाजार समितीमध्ये गहू ६२४ क्विंटल, हायब्रिड ज्वारी १३, रबी ज्वारी २२४, हरभरा ११ हजार ५०४, तूर ५ हजार ...
सोमवारी बाजार समितीमध्ये गहू ६२४ क्विंटल, हायब्रिड ज्वारी १३, रबी ज्वारी २२४, हरभरा ११ हजार ५०४, तूर ५ हजार १२७, करडी १७०, चिंच १ हजार १४७, तर ५१४ क्विंटल चिंचोक्याची आवक झाली. गव्हाला २२००, हायब्रीड ज्वारीला ९००, रबी ज्वारी २१००, हरभरा ५ हजार १२५, तूर ६ हजार ३००, करडी ४ हजार ३००, चिंच ६ हजार ३८०, तर चिंचोक्याला १ हजार ४०० रुपये क्विंटलचा दर मिळाला. शासनाच्या वतीने सोयाबीनला ३ हजार ८७० रुपयांचा हमीभाव जाहीर करण्यात आला आहे. दरम्यान, खाद्यतेलाच्या किमतीत वाढ झाल्याने सोयाबीनच्या दरात वाढ झाली असून, सोयाबीनला आतापर्यंतचा उच्चांकी ७ हजार ३१० रुपयांचा दर मिळत आहे. यासोबतच तुरीला ६ हजार ३०० रुपयांचा भाव मिळत आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बाजार समिती प्रशासनाच्या वतीने शेतकरी आणि व्यापाऱ्यांच्या वाहनासाठी वेळा ठरवून दिल्या आहेत. तसेच मास्क, फिजिकल डिस्टन्स, आदी नियमांचे पालन करण्याच्या वेळोवेळी सूचना केल्या जात असल्याचे बाजार समिती प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
सोमवारी ११ हजार क्विंटल हरभरा दाखल...
उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवारी ११ हजार ५०४ क्विंटल हरभऱ्याची आवक झाली. इतर शेतीमालाच्या तुलनेत ही सर्वाधिक आवक आहे. हरभऱ्याला ५ हजार २२६ रुपयांचा कमाल, ५००४ रुपयांचा किमान, तर ५ हजार १२५ रुपयांचा सर्वसाधारण दर मिळाला. यासाेबतच बाजार समितीमध्ये यंदाच्या हंगामातील चिंच आणि चिंचोकाही विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात दाखल होत आहे. प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करीत बाजार समितीमध्ये व्यवहार पार पाडले जात आहेत.