आवक मंदावल्याने साेयाबीनचे प्रति क्विंटल दर स्थिर! लातुरात काय स्थिती, जाणून घ्या
By राजकुमार जोंधळे | Published: December 18, 2023 10:17 PM2023-12-18T22:17:37+5:302023-12-18T22:19:13+5:30
१३,२७१ क्विंटल आवक; प्रति क्विंटलला ४६०० रुपयांचा दर
राजकुमार जाेंधळे, लातूर: शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या साेयाबीनसह इतर शेतमालाची आवक मंदावली आहे. परिणामी, साेयाबीनचे प्रति क्विंटलचे दर स्थिर झाले आहेत. तर शनिवारी लातूरच्या आडत बाजारात १३ हजार २७१ क्विंटलची आवक झाली.
साेयाबीनला प्रति क्विंटल किमान दर ४ हजार ६०० रुपयांचा मिळाला असून, आंतरराष्ट्रीय बाजारात घडणाऱ्या घडामाेडी आणि देशातील केंद्र सरकारच्या धाेरणामुळे शेतमालाच्या दरात चढ-उतार हाेत असतात. दिवाळीपूर्वी साेयाबीनला प्रतिक्विंटल ५ हजार ३०० ते ५ हजार ४०० रुपयांचा दर मिळाला हाेता. आता ताेच दर दिवाळीनंतर घसरला आहे. साेयाबीनची आवक घसरण्याबराेबरच दरातही घसरण झाली आहे. लातुरातील बाजार समितीत दैनंदिन हाेणारी साेयाबीनची आवक १३ हजारांवर आली आहे. आता दरही ४ हजार ५०० रुपयांवर स्थिरावले आहेत.
तारण याेजनेचा लाभ घ्यावा
बाजार समितीने शेतकऱ्यांसाठी तारण याेजना सुरू केली असून, ७० टक्के कर्ज उचल म्हणून दिले जाते. या याेजनेचा शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळत असून, बाजार समितीच्या तारण याेजनेचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा. - सतीश भाेसले, सहसचिव, बाजार समिती, लातूर
भविष्यात दर वाढण्याची आशा
साेयाबीनला सध्या मिळणारा दर हा समाधानकारक नाही. मात्र, भविष्यात दर वाढण्याची आशा आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील घडामाेडीवर हे दर अवलंबून आहेत. शेतकऱ्यांनी गरज असेल तरच साेयाबीन विक्री करावी, अन्यथा तारण याेजनेचा लाभ घ्यावा.
-अशाेक अग्रवाल, व्यापारी, लातूर