भरधाव रुग्णवाहिकेची धडक; महिला जागीच ठार, पुरुष गंभीर

By राजकुमार जोंधळे | Updated: February 14, 2025 23:47 IST2025-02-14T23:46:45+5:302025-02-14T23:47:17+5:30

बाबुराव गोविंद गुरमे हे गंभीर जखमी झाले. त्यांना अहमदपूर येथे प्राथमिक उपचार करुन लातूरला पाठवले आहे.

Speeding ambulance hits woman; Woman dies on the spot, man critical | भरधाव रुग्णवाहिकेची धडक; महिला जागीच ठार, पुरुष गंभीर

प्रतिकात्मक फोटो

अहमदपूर (जि. लातूर) : रुग्णवाहिकेच्या धडकेत एक महिला ठार तर पुरुष गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी घडली.

वळसंगी येथील छाया मनोहर गुरमे (वय ५५) आणि त्यांचा दीर बाबूराव गोविंद गुरमे (७०) हे शुक्रवारी १४ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी सातच्या सुमारास शेतातून रस्ता ओलांडून घराकडे जात होते. दरम्यान, त्याचवेळी रुग्णवाहिका (एम.एच. २४ ए.यू. ५८६५) हाडोळतीकडून शिरूर ताजबंदकडे जात होती. वळसंगी पाटीनजीक रुग्णावाहिकेने दोघांना जाेराची धडक दिली. यात छाया मनोहर गुरमे या जागीच ठार झाल्या. बाबुराव गोविंद गुरमे हे गंभीर जखमी झाले. त्यांना अहमदपूर येथे प्राथमिक उपचार करुन लातूरला पाठवले आहे.

Web Title: Speeding ambulance hits woman; Woman dies on the spot, man critical

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.